![10431](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/10431.jpeg)
चन्द्रशेखर मोरेश्वर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली.
भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.
जागतिक मंदी या विषयावर त्यांनी ७ महिन्यात ९० भाषणे केली होती. आणि त्यांचे एकुण ९ अंदाज बरोबर ठरले होते.
गेली २५ वर्षें टिळक सातत्याने अर्थसंकल्पीय विश्लेषणाचे कार्यक्रम करतात. आजपर्यंत त्यांचे विविध विषयांवरचे १५००हून जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. महाराष्ट्रासह इतरत्र त्यांची १६०० व्याख्याने झाली आहेत, तसेच अनेक संस्थांमध्ये ते मानद व्याख्याता आहेत.
त्यांची विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत उदा. जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण – बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ‘वंदे मातरम्’चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन
Leave a Reply