१९६० च्या दशकात भारतीय क्रिकेटचा हुकुमी आधारस्तंभ असलेले अष्टपैलू खेळाडू व प्रशासक चंदू बोर्डे यांचा जन्म २१ जुलै १९३४ रोजी पुणे येथे झाला.
चंदू बोर्डे यांचे पूर्ण नाव चंद्रकांत गुलाबराव बोर्डे. चाहते त्यांना “चंदू’ या लाडक्या नावानेच संबोधित. विजय हजारे हे त्यांचे फलंदाजीतील आदर्श होते. १९६४ साली खेळताना त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळे नंतर बोर्डे गोलंदाजी करू शकले नाहीत. उर्वरित कारकीर्द त्यांनी जास्ती करून फलंदाज म्हणूनच गाजवली.
१९५४-५५ च्या मोसमात ते प्रथम रणजी सामन्यात गुजरात विरुद्ध बडोदा संघाकडून खेळले. १९६४ पासून ते महाराष्ट्रातर्फे खेळू लागले. काॅन्ट्रॅक्टर, पाॅली उम्रिगर, रामचंद, सुभाष गुप्ते अशांचा कालखंड जेव्हा चालू होता, त्या काळात १९५८ साली चंदू बोर्डे मैदानावर उतरले. नंतर १९७२ पर्यंत ते मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळत राहिले.
कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघ व्यवस्थापक, निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष म्हणून त्यांनी सेवा बजावली. वेस्ट इंडिज दौऱ्यात १९५८ मधे चंदूबोर्डेंना कसोटीत खेळण्याची संधी मिळाली. इंग्लंडविरूद्ध भारताला पहिला विजय मिळवून देणाऱ्या १९६२ च्या मालिकेत त्यांची कामगिरी लक्षणीय होती. दुसऱ्या कसोटीत पाच बळी मिळवून त्यांनी भारतीय विजयाचा पाया रचला. १९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply