चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात स्वत:च्या अभिनयामुळे नावाजलेलं तरुण व्यक्तिमत्व म्हणजे चिन्मय मांडलेकर होय.
२००३ साली त्यांनी राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील नाटकांपासून सुरुवात केली. ते तेव्हापासूनच कला क्षेत्रात कार्यरत आहेत. झी मराठी वरील “वादळवाट”, “असंभव”, या आणि अशा अनेक मालिकांमधुन विविध भूमिका त्यांनी साकारल्या.२००८ साली सनई चौघडे या चित्रपटाद्वारे चित्रपट क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले आणि त्यांनतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. “मोरया” , ” विजय असो ” , ” झेंडा ” या चित्रपटांमध्येही त्यांनी यशस्वी भूमिका साकारली आहे. त्याशिवाय झी मराठी वाहिनीवरील “तू तिथं मी” या मालिकेचं लेखन व “सत्यजीत” ही व्यक्तीरेखा साकारुन प्रेक्षकांकडून प्रचंड दाद मिळवली आहे. चिन्मय मांडलेकरना २०१० साली पी. सावळाराम पुरस्काराने सन्मानीतही करण्यात आले आहे. आय.एन.टी. मध्ये ३ वर्षे सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता म्हणून त्यांना गौरवण्यात आलं आहे.
ठाण्यात ते भीमांसा ह्या सेवाभावी संस्थेचे काम पाहात आहेत. ठाणे महानगर पालिकेच्या शाळांमधून स्पेशल एज्यूकेशनचे वर्ग ते चालवतात.
Leave a Reply