कोल्हटकर, चित्तरंजन चिंतामणराव

जन्म- १५ जानेवारी १९२३, अमरावती

मृत्यू- २५ ऑक्टोबर २००९; पुणे

चित्तरंजन चिंतामणराव कोल्हटकर हे मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. ‘भावबंधन’ नाटकातील ‘मोरेश्वर’ या भूमिकेतून ४ फेब्रुवारी, १९४४ रोजी कोल्हटकरांचे नाट्यक्षेत्रात पदार्पण झाले. भालजी पेंढारकरांच्या ‘गरीबांचे राज्य’ या चित्रपटामार्फत त्यांचे चित्रपटक्षेत्रात पदार्पण झाले. १९५० साली झळकलेल्या ‘कुंकवाचा धनी’ या चित्रपटात त्यांना नायकाची व्यक्तिरेखा साकारायची संधी सर्वप्रथम लाभली. अभिनयाशिवाय कोल्हटकरांनी नाटकांचे दिग्दर्शनही केले. १९६४ सालातले ‘मोहिनी’ हे त्यांनी दिग्दर्शिलेले पहिले नाटक होते.कोल्हटकरांनी ‘रंगात रंगलो मी’ हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले. संघटनात्मक कार्य १९८७ साली इंदुरात भरलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद कोल्हटकरांनी भूषवले. तसेच, नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्षपदही त्यांनी सांभाळले.
चित्तरंजन कोल्हटकर यांचे मराठीसृष्टीवरील लेख

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*