नृत्यकला म्हटलं की आपल्या समोर उभी राहते ती सालस, सोज्वळ मुद्रेनी, चपळ पदलालित्यांनी मोहिनी घालणारी नृत्यांगना. बरं नृत्य ह्या कलेवर अभिजीत हुकुमत स्त्रीयांचीच असा आपला मानस असतो आणि आहे. परंतु या आपल्या सर्व तर्क-वितर्कांना छेद देत ज्यांनी आपल्या नृत्यकौशल्याने सबंध जगाला मोहून टाकलं ते आपल्या ठाण्यातलं व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ भरतनाट्यम नर्तक दीपक मुजुमदार.
दीपकजी एक यशस्वी भरतनाट्यम नर्तक, गुरु आणि नृत्य दिग्दर्शक या तीनही वैशिष्ट्यांचे मानकरी ठरले आहेत. दीपकजी हे दूरदर्शनवरील उच्च मानांकित कलाकारांपैकी आहेत. नृत्यातील आपल्या अभिनय कौशल्याने दीपकजींनी भारतीय शास्त्रीय नृत्याची जगभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भरतनाट्यम् विषयात पदव्युत्तर पदवी मिळवणारे ते पुरुष नर्तक आहेत. एक नृत्यदिग्दर्शक म्हणून पद्मश्री हेमामालिनी यांच्या अनेक नृत्यरचना गेली २० वर्षे ते रंगवत आहेत. तसेच नीता मुकेश अंबानी या त्यांच्या शिष्या आहेत.
पुरस्कार : त्यांना आजवर “सुवर्णपदक” १९७१, डॉ. बालमुरली कृष्ण यांच्याकडून “युवा कला विपंची” २००८, सत्याचार्य सुंदरमभारतांजली पुरस्कार २००७, भारतीकला क्षेत्र इस्कॉनचा “प्रभू पद संपूर्ण पक्ष” २०१०, नृत्यभारतीचा २०११ चा जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply