देवकी पंडित

“देवकी पंडित”….मराठी संगीत जगतातलं, सध्याचं एक आदरणीय नाव…..सारेगमप मधला त्यांचा “पण” नेहमीच अचूक असयचा…..एखाद्या गाण्याबद्दलचं त्यांचा अभ्यास अगदी वाखडण्याजोगा असतो.त्यांचा जन्म ६ मार्च १९६५ रोजी झाला.

आभळमाया, वादळवाट, अवघाची संसार….आणि अश्या अनेक सीरियल्स ची टाइटल गाणी देवकीजींच्या आवाजात अगदी सुरेल आणि सुमधुर वाटतात. ह्रदयाच्या तारा छेडणाऱ्या आणि आज आपल्या सुमधुर आवाजाने घराघरात पोहोचलेल्या देवकी पंडित.

शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजवत असतानाच हिंदी-मराठी चित्रपटांसाठी पाश्र्वगायन करणाऱ्या, मालिकांच्या शीर्षकगीते करणाऱ्या देवकी पंडित यांनी सुरुवातीला आपली आई उषा पंडित यांच्याकडे गाणे शिकल्यानंतर त्यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे काही काळ संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर किशोरी आमोणकर, व जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शिकायची संधी त्यांना मिळाली. गुरूंकडून सतत शिकत रहावे या वृत्तीने त्या पुढेहा मा.बबनराव हळदणकर, डॉ अरुण द्रविड यांची मार्गदर्शन घेत राहिल्या.

तानसेन, मल्हार, सवाई गंधर्व यांसारख्या प्रख्यात संगीत महोत्सवांमधून त्यांच्या शास्त्रीय गायनाच्या मैफली गाजल्या. तसेच ‘अस्तित्व’, ‘कभी हां कभी ना’, ‘मान्सून वेडिंग’, ‘वॉटर’, ‘साज’ अशा हिंदी चित्रपटांसाठी केलेल्या पाश्र्वगायनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला.

‘सावली’, ‘अर्धागी’ अशा मराठी चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कारही मिळाले. ‘आभाळमाया’, ‘हसरतें’, ‘रामायण’ या गाजलेल्या मालिकांच्या शीर्षकगीतांमधून देवकी पंडित या घराघरांत पोहचल्या. ‘रिअॅलिटी शो’च्या परीक्षक म्हणून काम करताना देवकी पंडित यांच्या मधील सुरांच्या अचूकतेबाबत आग्रही असणारी गायिका सामान्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचली.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*