दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.
सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी नोकरी केली. त्यानंतर गेली २७ वर्षे ते स्वतंत्र उद्योग करीत आहेत.
दास प्रिसिजन मशीन टूल्स प्रा. लि. या आपल्या कंपनीत ते स्प्रिंग कॉयलिंग मशीन, वायर डि-कॉयलर, चिप रिंगर्स, चिप श्रेडर्स यासारखी मशिनरी बनवतात. त्याचप्रमाणे सी.एन.सी मशीनचे जॉबवर्कही ते करतात. ते बनवत असलेली सर्व मशीन्स त्यांनी स्वत: विकसीत केलेली आहेत. त्यातील चिप रिंगर्ससाठी त्यांना पेटंटही मिळाले आहे.
त्यांना आतापर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट उद्योजक हा डी. आय. सी. चा पुरस्कार, ब्राह्मण सेवा संघ दादर यांचा उद्योजक पुरस्कार, ज्वेल ऑफ टिसा असे पुरस्कार मिळाले आहेत. ते ठाणे जनता सहकारी बॅंकेचे काही काळ संचालक होते. रोटरी क्लब, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रिज असो. ठाणे मॅन्यु. असो. या संस्थांचे ते सभासद आहेत. सामाजिक कार्यातही त्यांचा पुढाकार असतो.
Leave a Reply