![MSS-0189-Dilip-Chitre-150x200](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2017/07/MSS-0189-Dilip-Chitre-150x200.jpg)
संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३८ रोजी झाला. “कविता” आणि “कवितेनंतरची कविता” या संग्रहांतून तसेच अनेक नियतकालिकांतून त्यांच्या कवितांचा निराळा ठसा दिसला, तसेच “चाव्या”, “शतकांचा संधिकाल”, “तिरकस आणि “चौकस” असे गद्यलेखनही त्यांनी केले. “सेज तुका” आणि “पुन्हा तुकाराम” ही तुारामांचा पुनर्शोध घेणारी इंग्रजी-मराठी पुस्तके नव्या वळणावरली ठरली. ५ काव्यसंग्रह, दोन नाटके, चाव्या, शतकांचा संधिकाल असे महत्वाचे लेखसंग्रह, आदी पुस्तके आणि गोदामहा दृश्यपट त्यांच्या नावावर आहे. उत्तरायुष्यात चित्रकार म्हणूनही त्यांची ओळख होती.
चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. १९६० साली त्यांचा ‘कविता’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिध्द झाला. मराठीत साठीच्या दशकात लघुनियतकालिकांची एक चळवळ सुरु झाली. चित्रे हे या चळवळीचे अध्वर्यू होते. त्यांनी ‘शब्द’ हे लघुनियतकालिक सुरु केले. इंडियन पोएट्री लायब्ररीत त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या ‘तुका म्हणे’ याचा ‘सेज तुका’ हा इंग्रजी अनुवाद केला आणि तुकोबांच्या साहित्याला जागतिक साहित्यात मानाचे स्थान मिळवून दिले. कथा, नाटक, कविता, भाष्य मिळून २४ पुस्तके मागे सोडून ते २००९ साली गेले.
दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांचे १० डिसेंबर २००९ रोजी पुणे येथे निधन झाले.
जन्म – १७ सप्टेंबर १९३८
मृत्यू – १० डिसेंबर २००९
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
# Dilip Purushottam Chitre
दिलीप पुरुषोत्तम चित्रे म्हणजे साहित्यातील सर्वांग चैतन्याचा झुळझुळणारा नैसर्गिक जिवंत झरा त्यांच्या कविता वाचताना सर्वोत्कृष्ट उत्कट जाणीवा प्रगल्भ आणि श्रीमंत करणारा त्यांच्या कवितेच्या अंगातच अंगची चाल,लय वाचताना मनात गुणगुणत असते. आणि तरल भारदस्त समृद्ध भरगच्च सुखाचा साक्षात्कार होतो कवितेला वेगळं गाण्याची गरजच पडत नाही. जणू लतादीदी अदृश्यपणे गाऊन गेल्या, असा क्षणभर भास होतो असा उच्य कोटीतील तरल आनंद अनुभवला आहे. कविता कळल्या नाही तरी वाचाच.मृत्युपूर्वी तरी त्यांच्या कविता वाचण्याच सुख आणि मोहीनी कळेल.