वेंगसरकर, दिलीप

Vegasarkar, Dilip

दिलीप वेंगसरकर यांचा जन्म ६ एप्रिल १९५६ रोजी महाराष्ट्र राज्यात राजापूर येथे झाला. भारतीय क्रिकेट खेळाडू आणि व्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. त्यांच्या काळात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण शैली असलेले फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते. अतिशय तडाखेदार आणि उत्तम [LINKA][98] फटके मारणारे फलंदाज [/LINKA] म्हणून ते गौरविले गेले होते. ‘कर्नल’ या टोपणनावाने ते सहखेळाडूंमध्ये लोकप्रिय होते. त्यांनी त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द १९७५-७६ साली ऑकलंड येथे न्यूझीलंड विरूद्ध सुरू केली. भारताने हा कसोटी सामना उल्लेखनीय असाच जिकला. ते १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य होते. त्यांनी १९८५ आणि १९८७ च्या दरम्यान धावांचा अक्षरशः पाऊसच पाडला. पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका यांच्या विरूद्ध अनेकवेळा शतके काढली. अनेक सामन्यांमध्ये त्यांना उल्लेखनीय यश मिळाले. वेंगसरकर यांना त्यांच्या कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर वर्गवारीमध्ये उत्तम फलंदाज म्हणून स्थान मिळाले. ज्यावेळी वेस्ट इंडिजच्या अतिजलद खेळाडूंचं क्रिकेट जगतावर अधिराज्य होतं तेव्हा दिलीप वेंगसरकर हा एकमेव फलंदाज असा होता की ज्याने वेस्ट इंडिज विरूद्ध यश मिळवून मार्शल, होल्डिंग, रॉबर्ट यांच्याविरूद्ध सहा शतके केली. त्यांनी लॉर्डस् मैदानावर १९८६ मध्ये शतकी खेळी करून धावांमध्ये विशेष प्रावीण्य मिळवून लॉर्डस् मैदानावर लागोपाठ तीन कसोटी सामन्यांमध्ये शतकं झळकवली. त्यांच्या या खेळामुळे भारताने इंग्लंडमधील कसोटी सामन्यांची मालिका जिकली व वेंगसरकर यांना मालिकावीर सन्मान मिळाला. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांपैकी वेंगसरकर हे सरासरी सर्वाधिक धावा करणारे एकमेव फलंदाज होते. १९८७ च्या विश्वचषकानंतर त्यांनी कपिलदेव कडून कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली. जरी त्यांनी कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या सामन्यात दोन शतके झळकवली तरी १९८९ चा वेस्टइंडिज दौरा हा वादग्रस्त ठरला. त्यामुळे कर्णधार पदाच्या जबाबदारीतून ते मोकळे झाले. आजही ते उत्तम खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत.

## Dilip Vengaskar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*