गांगल, दिनकर

ग्रंथाली प्रकाशन हे साहित्याची जाण व चोखंदळपणा या दोन्ही बाबींसाठी मराठी भाषेतील एक अग्रेसर प्रकाशन समजले जाते. दिनकर गांगल यांचा, या प्रकाशनाला गरूड भरारी मारण्यास प्रवृत्त करण्यामागील सहभाग महत्वाचा व मोलाचा मानला जातो. या रत्नपारखी संपादकाने ग्रंथाली साठी अनेक तळागाळातील हौशी कवींना व लेखकांना हुडकून व त्यांना विविध विषयांवर लिहीण्याबाबत मार्गदर्शन केले आणि त्यांचे विचार सुध्दा समृध्द केले.

दिनकर गांगलांमुळे मराठी वाचकांना अनेक विचारगंगांमध्ये आपले हात धुवावयास मिळाले, व वेगवेगळ्या स्तरांतील तरूणांच्या महत्वाकांक्षा, स्वप्ने, विचार, मनिषा यांचे उत्कट दर्शन या निमीत्ताने साहित्यपटलावरती पाहावयास मिळाले. त्यांच्या रूपाने मराठी साहित्याला चतुरस्त्र विचार करणारा व अफाट नेतृत्वकौशल्ये अंगी बाळगणारा संपादक लाभला हे विशेष!

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*