दिनकर केशव बेडेकर हे एक महान साहित्यिक, विचारवंत, तत्वचिंतक व समिक्षक होते. महाराष्ट्रामध्ये वाहणार्या हजारो सामाजिक, राजकीय, साहित्यीक, तार्किक, धार्मिक, व तात्वज्ञानिक विचारप्रवाहांना व मतधारांना जोडणारा पुल त्यांनी आपल्या सिध्दहस्त लेखणीच्या माध्यमातून साकारण्याची अनोखी कसरत केल्यामुळे त्यांच्या नावाभोवती प्रसिध्दीचे एक वेगळे वलय निर्माण झाले. “किर्लोस्कर”, “स्त्री”, “नवभारत” अश्या विविध नियतकालिकांमधून त्यांनी अनेक वर्षे विपूल लेखन करत, विविध संवेदनशील विचारांना स्पर्श केला. निर्भीड व पारदर्शी लेखांप्रमाणेच त्यांनी केलेली साहित्य समिक्षा देखील आज त्या विषयांसाठी मार्गदर्शक मानली जाते.
“नवकाव्य”,”नवकथा”,”सौंदर्यमीमांसा”,”अस्तित्ववाद”,”चित्रकलेतील नवप्रवाह” अशा वेगवेगळ्या विचारप्रणालींचे उत्खनन करून त्यात आपल्या बुध्दीचा व तात्विक निकषांचा अर्क टाकून त्याचा अर्थ सुध्दा रसिकां पर्यंत पोहोचविला. दिनकर बेडेकरांच्या लेखणीने त्यांच्या नियमित वाचकांच्या मनातील प्रगल्भ विचारांची दालने उघडण्याचा सदैव प्रयत्न केला, असे म्हटले तरी वावगं ठरणार नाही.
भारताच्या राजकीय, सामाजिक व तार्किक सक्षमीकरणाचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून, बेडेकरांनी तब्बल ६०० च्या वर लेख लिहिले. “आधुनिक मराठी काव्यः उदय, विकास, आणि भवितव्य” तसेच “अस्तित्ववादाची ओळख” ही स्वतंत्र पुस्तकेदेखील दिनकर बेडेकरांनी लिहिली आहेत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
Leave a Reply