मन नेहमीच सर्वच क्षेत्रातील लोकांसाठी अभ्यासाचा कुतूहलाचा विषय झालेला आहे. जगातील सर्वंत वेगवान आणि आवरायला कठीण गोष्ट कोणती; तर ते आहे आपलं मन ! पण काही व्यक्ती अशा आहेत ज्या मनावर अधिराज्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी! व्यवसायानं डॉ. नाडकर्णी हे मानसोपचारतज्ञ आहेत. परंतु मानसोपचार करणं हा निव्वळ त्यांचा व्यवसाय नसून ती त्यांची सामाजिक बांधिलकी, कर्तव्य आहे असं ते समजतात. त्यांच्या वडिलांनी दिलेल्या सेवाव्रती वारसा ते आपल्या क्षेत्रातून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानसिक आरोग्य क्षेत्रात ठाण्याची ओळख फक्त मानसिक रुग्णालय एवढीच मर्यादित होती. परंतु गेली बावीस वर्षे “इन्स्टीट्यूट फॉर सायकॉलॉजी हेल्थ” या संस्थेद्वारे अनेकविध उपक्रम ठाणे शहराच्या पाठिंब्यामुळेच उभे राहिले असं ते म्हणतात.
पुरस्कार : डॉ. नाडकर्णी यांना त्यांच्याकार्याबद्दल “इंडियन मर्चंटचेंबर” प्लॅटिनम ज्युबली पुरस्कार, डॉ. अरुण लिमये स्मृती पुरस्कार, शतायुषी पुरस्कार, आय.एम.ए. चा “डॉक्टर ऑफ द इयर” १९९३, आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे.
Leave a Reply