आपलं हृदय हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा घटक असतो आणि त्याचीच आपण योग्यरितीनं काळजी घेत नाही; अशावेळी काही विपरित घडलं तर डॉ. हाच देव ठरतो! असाच कर्मयोगी देव म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल भास्कर तांबे एम.बी.बी.एस्., एम.डी., एफ.सी.पी.एस् हे शिक्षण सुवर्णपदकासह मुंबईतून फक्त १९७५-७६ साली शिकागो येथील कार्डिओलॉजिस्ट महाविद्यालयाची शिष्यवृत्ती मिळालेले डॉ. तांबे हे गेली ३८ वर्षे या क्षेत्रात कार्यरत आहेत. आजपर्यंत त्यांनी ४०० ते ५०० गरजू रुग्णांना बरं केलं आहे. डॉ. तांबे यांनी आपल्या शिक्षणाचा, ज्ञानाचा उपयोग फक्त पैसा मिळवणे या हेतूसाठी मर्यादित न ठेवता, एक सृजनशील माणूस म्हणून सामाजिक जाणीवेतून लोकसेवेसाठीच केला असल्याचे समजते. म्हणूनच ते आज यशाच्या उंच शिखरावर असूनही लोकसेवेचा वसा त्यांनी चालूच ठेवला आहे.
पुरस्कार : त्यांना “ठाणे गौरव पुरस्कार”, “घंटाळी मित्र मंडळ पुरस्कार”, “आय.एम.ए. पुरस्कार”, इ. २६ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.
<!–
– हृदयरोग तज्ञ
पत्ता : “श्री”, ७ आर., गावंड पथ, नौपाडा, ठाणे ४००६०२
कार्यक्षेत्र : वैद्यकशास्त्र
भ्रमणध्वनी : ९८२०५४८०४१
ई-मेल : anandiph@gmail.com
–>
Leave a Reply