अनिल काकोडकर यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९४३ रोजी बरवानी या संस्थानात ( जे सध्या मध्यप्रदेश राज्यात येते) झाला. त्यांचे आई व वडिल दोघेही स्वातंत्र्य प्राप्ती लढ्यात अतिशय सक्रिय असलेले असे गांधीवादी अनुयायी होते. शालेय शिक्षण बरवनियाड, खारगोणे येथे पुर्ण केल्यानंतर ते मुंबईमधील रूपारेल कॉलेजमध्ये उच्च शिक्षणासाठी दाखल झाले. मॅकेनिकल इंजिनीअरिंग ची पदवी मात्र त्यांनी व्ही. जे. टी. आय. या नामांकित कॉलेजमधून प्राप्त केली. तसेच मास्टर्स ही डिग्री त्यांनी नॉटिनघम विद्यापीठामधून घेतली. १९६४ मध्ये ते भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमधल्या रिअॅक्टर इंजिनीअरिंग डिव्हीजन मध्ये सेवेस रूजु झाले. भारताची अणु तंत्रज्ञानामधील वेगवान प्रगती व बहारदार घौडदौड अधोरेखित करणार्या ध्रुव रिअॅक्टर च्या बांधणीपासून ते त्याचे यशस्वी उड्डाण पार पडेपर्यंतची सगळी जबाबदारी त्यांच्या शिरावर सोपवली गेली होती. १९७४ व १९९८ च्या भारताच्या यशस्वी शांततापुर्ण अणु चाचण्यांचे शिल्प्कारसुध्दा तेच होते.
भारताला अणु उर्जा निर्मीतीमध्ये स्वयंपुर्ण बनविण्यामागे जे रथी व महारथी आहेत त्यांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा. भारताचा अणुउर्जेतील टंचाई पासून ते अगदी आजपर्यंतच्या, जिथे भारताची अत्यंत विकसीत अणुउर्जेची व क्षेपणास्त्रांची प्रणाली पाहून अमेरिकेसारख्या देशालाही आपणहून आपल्याकडे दोस्तीचा हात पुढे करायला यायला लागत, या सार्या गौरवशाली व शहारून टाकणार्या प्रवासातील ते केवळ साक्षीदारच नाहीत, तर हे चित्र पालटायला त्यांची प्रत्येक वेळी मोलाची मदत झालेली आहे. भारतातील अणुशास्त्रज्ञांच्या माळेतील ते एक अत्यंत दुर्मिळ व संपुर्ण माळेला ज्याच्यावर गर्व असावा, असे मणी आहेत व प्रत्येक उपक्रमांच्या वेळी त्यांच्या हुशारीची व आभ्यासपुर्ण कल्पकतेची चमक ही सर्वांना दिसून आलेली आहे. भारताने पोखरण इथे दुसर्यांदा अण्वस्त्रांच्या चाचण्या केल्या. आज भारताजवळ अॅटमबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब, काही कमी शक्तीचे परंतु कुठेही वापरता येतील असे अणुबॉम्ब, अशी संरक्षणासाठी लागणारी शस्त्र सामुग्री मुबलक प्रमाणात आहे. या घवघवीत यशामागे काकोडकरांसारख्या जेष्ठ संशोधकांची, अपार मेहेनत व सर्व संकंटांवर कडी करणारी त्यांची निष्ठा व साधना होती. बाँबसाठी लागणारे प्लुटोनियम तयार करणारी अणुभट्टी बनविण्यामध्येही त्यांचा महत्वाचा सहभाग होता. बॉम्बमध्ये वापरण्याचे प्लुटोनियम चे गोळे साधारण क्रिकेटच्या चेंडुएवढे असतात. हे अत्यंत अचूकपणे बनवायला त्यांच्यासारखा अत्यंत सफाईदार, कौशल्यवान व तंत्रज्ञानाबद्दल खरी अभिरूची बाळगणारा तंत्रज्ञच लागायचा.
हायड्रोजन बॉम्ब बनविण्यासाठी तर उच्च दाबाची यंत्रणा आणि अचूक इंजिनीअरिंगची आवश्यकता असते. शिवाय बॉम्बच्या चाचण्या च्या खोलवर खणलेल्या विहिरीत होतात त्या हायड्रोजन बाँबच्या धक्क्याने कोसळू नयेत आजूबाजूंच्या खेड्यांना धक्के बसू नयेत किरणोत्सार जमिनीच्या वर येवू नये ही सर्व काळजी घ्यावी लागते. काकोडकरांमधल्या अलौकिक व अचुक इंजिनीअरिंग कौशल्यांचा अशा वेळी प्रत्ययच यायचा. प्रचंड उर्जा व असामान्य कार्यक्षमता हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्वामधील सर्वांना परिचीत असलेले विशेष पैलु होते.
डॉ.अनिल काकोडकर यांना भारत सरकारच्या “पद्मश्री”, “पद्मभुषण”, आणि “पद्मविभूषण” अश्या तिन्ही मानाच्या पुरस्काराने सन्मानित केलं असून, अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल त्यांना “फिक्की पुरस्कार” तसंच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले आहे.
Leave a Reply