भाभा, (डॉ.) होमी जहांगीर

Bhabha, Dr. Homi Jahangir

Dr Homi Bhabha

भारतातील अणुसंशोधन आणि अवकाश संशोधनाचे जनक डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबई येथे ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. केंब्रीज विद्यापीठात भाभांचे उच्च शिक्षण झाले. भोर आणि रुदर फोर्ड या दोन शास्त्रज्ञांच्या हाताखाली शिक्षण घ्यायची संधी त्यावेळेस त्यांना मिळाली. मायदेशी परतल्यावर ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक आणि संचालक म्हणून ते काम पाहू लागले. त्यानंतर अणू उर्जा आयोगाचे ते अध्यक्ष झाले. १९५६ मध्ये तुर्भे येथे आशियातील पहिली अणुभट्टी त्यांच्याच प्रयत्नाने उभारण्यात आली. भारतात अणुपर्वाची सुरुवात करणार्या डॉ. भाभा यांना अणू क्षेत्रातील कामाबद्दल ‘अॅडम्स पारितोषिक’, ‘हॉपकिन्स पारितोषिक’, ‘पद्मभूषण’ इत्यादी अनेक पुरस्कार लाभले. भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्षस्थान ही त्यांनी भूषविले. अणूचा शांततेसाठी उपयोग करण्याच्या धोरणासंबंधी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे ते अध्यक्ष होते. डॉ. भाभांचे चित्रकार, संगीतरसिक, वृक्षप्रेमी असे अनेक पैलू असलेले व्यत्ति*मत्त्व होते.

२४ जानेवारी १९६६ ला स्वित्झर्लंड येथील ‘माँट ब्लॉक’ या शिखरावर झालेल्या विमान अपघातात काळाने त्यांना हिरावून नेले. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ तुर्भे येथील अणु संशोधन केंद्राला १२ जानेवारी १९६७ रोजी ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ असे नामाभिधान करण्यात आले.

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

3 Comments on भाभा, (डॉ.) होमी जहांगीर

Leave a Reply

Your email address will not be published.


*