नारळीकर, (डॉ.) जयंत विष्णू

Jayant Narlikar

सुप्रसिद्ध संशोधक जयंत नारळीकरांचा जन्म १९ जुलै १९३८ साली झाला.

जयंत नारळीकरांचे वडील विष्णुपंत हे बनारस हिंदू विद्यापिठात रँगलर होते. त्यामुळे जयंत नारळीकरांचे शिक्षण बनारसालाच झाले. त्यांच्या आई संस्कृत विषयात एम. ए. झालेल्या होत्या. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाकडे त्या लक्ष देत.

१९५७ साली त्यांनी बनारस हिंदू विद्यापिठातून पहिला येऊन त्यांनी बी.एस्सी. ची पदवी घेतली. गणितात ते सर्वप्रथम आल्याने त्यांना टाटा शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे गणिताचे उच्च शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले.

१९६६ साली नारळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे (गणितज्ञ) ह्यांच्याशी झाला. त्यांना तीन मुली आहेत – गीता, गिरिजा व लीलावती. १९६० साली त्यांनी रँग्लर ही पदवी मिळविली. तसेच १९६३ साली त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही परीक्षा ते पास झाले.

रेडीओ सोर्सेसच्या लेखनामुळे ते संशोधक म्हणून प्रसिध्द झाले. “अराउंड ऑफ टाईम“ ह्या विषयावर त्यांनी केलेले भाषण चौसष्ट साली गाजले. १९६५ साली भारत सरकारने त्यांना संशोधनाच्या महान कार्याबदद्ल पद्मभुषण देऊन त्यांचा गौरव केला.

त्यांचा महत्त्वाचा सिध्दांत म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा नवा सिध्दांत होय. ते आणि त्यांचे सहकारी डॉ. हॉईल यांनी संशोधनाअंती असे सांगितले कि विश्वातील अत्यंत दूरचे तारे जर नष्ट झाले तर पृथ्वीवरच्या लोकांचे वजन दुपटीने वाढेल आणि सुर्याची उष्णता शंभर पट अधिक होईल. आपला हा सिंध्दांत त्यांनी गणिताच्या आधाराने सिध्द केल्यामुळे विश्वास न बसणार्‍या ह्या सत्य संशोधनावर शास्त्रज्ञांचाही विश्वासही अखेरीस बसला.

त्यांच्या ‘चार नगरांतील माझे विश्व’ या पुस्तकासाठी २०१४ चा  ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ त्यांना जाहिर झाला.

जयंत नारळीकरांना पतंग उडवणे आवडत होते. कदाचित त्यामुळेच त्यांना खगोलविज्ञानाची गोडी लागली असेल.

जीवनपट 
जन्म : १९ जुलै १९३८
शिक्षण : बी.एस्सी. (बनारस), बी.ए.(केंब्रिज), पी.एच.डी (केंब्रिज), एम.ए. (केंब्रिज), डि,एस,सी. (केंब्रिज)

नारळीकरांनी भूषविलेली विविध पदेः

संचालक गणित शिक्षण, केंब्रिज
बेरी रॅम्से फेलो, केंब्रिज
वरीष्ठ संशोधन फेलो, केंब्रिज
व्याख्याता, सैधांतिक खगोल विज्ञान, केंब्रिज
प्राध्यापक, टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेन्टल रीसर्च, मुंबई.
संचालक आयुका, पुणे.

विषेश कामे
जगातल्या अनेक विद्यापिठात अभ्यागत प्राध्यापक.
सैद्धातिंक, भौतिक व खगोल विज्ञानात अनेक पुस्तके.
मराठी, हिंदी, इंग्रजीत विज्ञान कथा, पुस्तके व कांदबरी लेखन.
आकाशवाणी दुरदर्शनवर कार्यक्रम
पंतप्रधानाचे वैज्ञानिक सल्लागार
मराठी विज्ञान परीषदेचे संमेलनाध्यक्ष.

संशोधन
स्थिर स्थिती सिद्धांत

चार दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचे अंतरीक्षविज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याच बरोबर सतत पुस्तके लिहिण्याचा कार्यक्रम चालू असतो. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसार माध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या ‘यक्षांची देणगी‘ या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला.

विज्ञानकथा पुस्तके

वामन परत न आला
अंतराळातील भस्मासुर
कृष्णमेघ
प्रेषित
व्हायरस
अभयारण्य
यक्षांची देणगी

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*