हृदय ही मानवाला मिळालेली सर्वात अमुल्य व कलात्मक भेट आहे. सामान्य माणसाला कवित्व देणारे, विविध भावनांचे पितृत्व स्वीकारणारे, यंत्रांच्या गर्दीमध्ये हरवत चाललेल्या व्यक्तींना संवेदनांचे व हळुवार जाणीवांचे शहारे देऊन त्याला माणुस म्हणून जगण्यास प्रवृत्त करणारे, व त्याच्यातील ‘दर्दीपण’ जोपासणारे हृद्य जेव्हा त्याच्या तांत्रिक बाबींमध्ये गुरफटते तेव्हा नश्वर देहाची परलोक यात्रा सुरू होते.
परंतु आज वैद्यकीय क्रांतीमुळे दुर्मिळ हृद्यविकारांवर देखील औषधे व शस्त्रक्रिया जन्मास आल्या आहेत. हृद्याची ही स्पंदने अबाधित चालु राहावीत यासाठी अनेक हृद्यशल्यविषारद अत्याधुनिक तंत्रांच्या साहाय्याने आपले कौशल्य पणाला लावत असतात. डॉक्टर के. एन. दस्तुर यांनी बरोबर पन्नास वर्षांपुर्वी, जी ऐतिहासिक, व सुवर्णाक्षरांमध्ये नोंद करण्यालायक ओपन हार्ट सर्जरी केली होती ती भारतातील पहिलीवहिली ओपन हार्ट सर्जरी तर होती, शिवाय ते नव्या, अधिक समृध्द व स्वयंपुर्ण वैद्यकिय पर्वाकडे गर्वाने उचलेले पाऊलदेखील होते. या सर्जरीचे पडघम केवळ भारतातच उमटले असे नाही तर परदेशातही या शस्त्रक्रियेबद्दल चर्चांच्या कित्येक फैरी झडल्या होत्या. एका सनदी अधिकाराच्या १९ वर्षाच्या हेमलता या मुलीच्या हृद्याला छिद्र होते. त्यावर १५ फेब्रुवारी १९६१ या दिवशी त्यांनी ही यशस्वी सर्जरी केली होती. डॉक्टर के. एन. दस्तुर हे केवळ विख्यात हृद्यविशारदच नव्हते तर संशोधक, अध्यापक, मार्गदर्शक, तत्वज्ञ व एक सुहृद्यी व्यक्ती अशा अष्टपैलू भुमिकांमध्ये सारख्याच सक्षमतेने व तन्मयतेने रमणारे एक प्रभावी व्यक्तिमत्व होते. के. एन. दस्तुर यांचा जन्म गुजरातमधील सुरत येथे झाला. मुंबईमधील ग्रॅट महाविद्यालयात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर लंडनच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी येथून त्यांनी एफ. आर. सी. एस. क .ले. भारतात परतल्यानंतर नायर रूग्णालयात मानद सर्जन म्हणुन त्यांनी काम सुरू केले. याच काळात त्यांनी हृद्यशस्त्रक्रिया कशा करतात याचा स्वतःच आभ्यास सुरू केला. यासाठी प्रथम त्यांनी कुत्र्यावर शस्त्रक्रिया करून पाहिली होती. आज जसे हृदयशस्त्रक्रिया शिकण्यासाठी परदेशात जाता येते तसे विशेष प्रशिक्षण त्या काळात नव्हते. त्यामुळे स्वतःच स्वतःचे गुरू होवून ते हृदयशस्त्रक्रीया तंत्र शिकले होते. दस्तुरांनी केलेल्या शस्त्रक्रियेचे मोठे किंवा दुर्मिळपण हे होते की, या सर्जरीसाठी आवश्यक असलेले ”हार्टलंग मशिन”ही त्यांनी स्वतः विकसीत केले होते. पन्नास वर्षांपुर्वी पालिका रूग्णालयासाठी हार्टलंग उपकरण आयात करणे ही अशक्य कोटींमधील गोष्ट होती. त्यांना प्रशासनाचे सहकार्य नव्हते, व उद्योजकांचे पाठबळही नव्हते. कारण अशी महागडी उपकरणे बनविल्यामुळे फायदा होऊ शकतो याची जाणीवही त्या काळात नव्हती. त्यामुळे पदराला खार लावून त्यांनी पहिले संपुर्ण स्वदेशी बनावटीचे हार्टलंग मशिन विकसीत केले. हार्टलंग मशिनप्रमाणेच ऑक्सिजनेटर सिस्टीमही त्यांनी विकसीत केली. पन्नास वर्षांनंतरही हार्टलंग मशिनचे तेच तंत्रज्ञान वापरले जात आहे यावरून त्यांचे मोठेपण ध्यानात येते. नायर रूग्णालयाच्या हृद्यशल्य विभागाप्रमाणेच नानावटी, जसलोक, ब्रीच कँडी रूग्णालयातील हृद्यशल्यचिकीत्सा विभाग त्यांनी डिझाईन केले आहेत. केवळ मुंबईतीलच नव्हे तर दिल्ली, श्रीनगर, जयपुर येथील मोठ्या रूग्णालयांमधील हृदयविभागाचे निर्माण दस्तुर यांनी केले आहे.
Like God Dr.KN Dastur sir done my heart surgery at Nanavati hospital Dt. 2-Dec-1980. Around 40 year before. Aortic valve replace, at that time my age is 15 year. I am live at Ahmedabad.
I am very healthy at the age of 54. Now days only 2 medicine I take acitrom 1 & 2 mg alternate
day. Losanom 25mg. once in a day.
Bhaskar Nayak
M-9998006711