डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचा जन्म २१ जानेवारी १८९४ या दिवशी बडोदा येथे झाला. १९१६ साली फारसी भाषा हा विशेष विषय निवडून बी.ए. पदवी मिळवली, तर १९१८ साली इंग्रजी साहित्य हा विषय निवडून एम.ए.चा पदव्युत्तर अभ्यासक्रम पुरा केला. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी असून, इंग्रजी कवी शेले याने रचलेल्या ज्यूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. ( माधव त्र्यंबक पटवर्धनांचे जूलियन नावाच्या मुलीवर प्रेम होते. तिच्याशी प्रेमभंग झाल्यानंतर तिची आठवण म्हणून त्यांनी माधव जूलियन हे टोपण नाव घेतले हीच माहिती लोकप्रसिद्ध आहे. याशिवाय ’गॉड्ज गुड मेन’ या कादंबरीतील नायिका ’ज्युलियन’ या व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्युलियन हे वाव उचलले असेही सांगितले जाते. )
पटवर्धन, (डॉ.) माधव त्र्यंबक (माधव जूलियन)
Patwardhan, (Dr.) Madhav Trambak Alias Madhav Julian
शिक्षणानंतर १९१८ ते १९२४ या कालखंडात ते फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे येथे फारसी भाषा शिकवत होते. त्यानंतर ते कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालयात फारसीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. तेथे त्यांनी १९२५ ते १९३९ या काळात अध्यापन केले.
मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. माधव ज्युलियनांनी “दित्जू”, “मा.जू.” आणि “एम्.जूलियन” या नावांनीही लेखन केले असून, पैकी काही लिखाण इंग्रजीतही आहे. कविवर्य भा.रा. तांबे यांच्या कवितांचे संकलन आणि संपादन त्यांनी केले आहे.
कवितांच्या व्यतिरिक्त पटवर्धनांनी भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणार्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे
“कशासाठी पोटासाठी”, “जीव तुला लोभला माझ्यावरी”, “प्रेम कोणीही करीना”, “प्रेमस्वरूप आई”, “मराठी असे आमुची मायबोली” या कविता खुपच प्रसिध्द आहेत.
१९३३ साली नाशिक येथे झालेल्या कविसंमेलनाचे जूलियन अध्यक्ष होते, तर १९३४ रोजी बडोदे येथे झालेल्या साहित्यसंमेलनात ते कविशाखेचे अध्यक्ष तर १९३६ मध्ये जळगाव येथे आयोजित मराठी साहित्य संमेलनाच अध्यक्ष पद माधव जूलियन यांनी भुषवलं.
“छंदोरचना” साठी मुंबई विद्यापीठाकडून डी. लिट. तर मराठी साहित्यातील योगदानाबद्दल भारतातली पहिली डी.लिट. प्रदान करण्यात आली होती. २९ नोव्हेंबर १९३९ रोजी माधव जूलियन यांचं निधन झाले.
डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (30-Nov-2016)
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (23-Jan-2017)
डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (23-Nov-2019)
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply