डॉ. मेधा मेहेंदळे हे आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तन्वी या ब्रॅन्डनेम खाली त्यांनी बनविलेली औषधे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहेत.
त्यांनी “तन्वी” ही औषधनिर्मिती कंपनी सुरु केली. हार्ट ब्लॉकेज, मधुमेह, अस्थमा, लठ्ठपणा इ. आजारावर औषधे उपलब्ध करुन फारच अल्पावधीत त्यांना प्रसिद्धी मिळाली. गेल्या २० वर्षांपासून मोफत रुग्ण तपासणीद्वारे त्यांनी गरजूंना मदतही केली.
त्यांनी महिलांनी उद्योजिका बनवण्यास हातभारही लावला. “गुरुकुल” या शाळेची स्थापना डॉ. मेधा मेहेंदळे यांनीच केली.
त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय प्रियदर्शनी, उद्योग श्री, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे महिला उद्योजिका, ठाणे नगररत्न अशा पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलेलं आहे.
Leave a Reply