आमटे, (डॉ.) प्रकाश

Dr Prakash Baba Amte

आदिवासी क्षेत्रात काम करणारे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत.

दि. २३ डिसेंबर १९७३ पासून ते त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात तसेच लोकांनी आणून दिलेल्या जखमी वन्य प्राण्यांवरही ते उपचार करतात.

त्यांच्या कार्याचा अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थाकडून गौरव करण्यात आला आहे. अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या मॅगसेसे पुरस्काराचे ते माकरी आहेत.

त्यांच्या कार्यावर आधारित `डॉक्टर प्रकाश बाबा आमटे – द रियल हिरो’ या नावाने त्यांच्या कार्यावर आधारितएक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

1 Comment on आमटे, (डॉ.) प्रकाश

  1. mala ekda dr. Prakash amate yana bhetaych aahe pan kas te kalat nahi.. majhi tyanchi bhet kashi hou shakte.. ph. No. Vagre kahi…. Tyana bhetun mala tyanche margadarshan ghyache aahe… Khup disturb aslyamule mothya apekshene massage karat aahe… Mi mumbait chotishi nokari karto, B.com aahe. Tar mala kahitari tyanche margdarshan milu shakel ka… Mothya apekshene ha massage pathvat aahe.. reply chi apeksha aahe.. lokbiradari baddal adhik janun ghyachi eechha aahe.. V N Bidkar 9769651079

Leave a Reply

Your email address will not be published.


*