ठाणे जसं कला, संस्कृती, साहित्य यांचं शहर आहे तसंच ठाण्यात वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळी अनेक वर्षं अविरतपणे वैद्यक सेवा देत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे “डॉ. राजन रेळेकर”!
डॉ. राजन हे १९८२ साली एम.बी.बी.एस. झाले. १९८६ साली एम.एस. मुंबईतून करुन डी.एन.बी. करायला दिल्लीला गेले आणि १९८७ साली डी.एन.बी. पूर्ण करुन के.ई.एम. रुग्णालयात प्रशिक्षण घेऊन तिथेच अधिव्याख्यता म्हणून नोकरी केली. १९९२ साली ठाण्यात स्वत:चा स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय त्यांनी सुरु केला. १९९७ साली डॉ. राजन यांनी “समर्थ नर्सिंग होम” हे स्वत:चे रुग्णालय सुरु केले. १९९२ पासून डॉ. राजन हे कळव्याच्या छ.शिवाजी महाराज रुग्णालयात मानस सेवा देत आहेत.
Leave a Reply