सुर्यवंशी, (डॉ.) रमेश सीताराम

डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्‍हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे. दहावी, व बारावी चांगल्या गुणांसहित उत्तीर्ण झाल्यानंतर बी. ए., एम. ए., पी. यु. सी., एम. एस. सी. आय. टी., बी. एड. व या सर्वांवर कडी करणारी पी. एच. डी., अशा एकामागुन एक पदव्या मिळवुन त्यांनी आपला शिरपेच मानाच्या तुर्‍यांनी अगदी भरून टाकला. तळागाळातील आदिवास्यांबद्दल व त्यांच्या पुरातन संस्कृतींबद्दल मनात प्रचंड कुतुहल असल्यामुळे ते त्यांची भाषा शिकले. अहिरानी बोलीच्या पहिल्या व एकमेव शब्दकोशाचे जनक म्हणून ते सर्वपरिचीत झाले. हा शब्दकोश काढून त्यातुन मिळणार्‍या प्रसिध्दीने ते हुरळुन गेले नाहीत तर अहिराणी बोली व वाक्य्प्रचार, तसेच भाषाविज्ञानिक आभ्यास प्रकाशित करून त्यांनी आदिवासी व शहरी संस्कृतीमधील दुव्याचे काम केले. खानदेशातील शेतकर्‍यांचे आगळे वेगळे भावविश्व साकारणारा त्यांचा कृषक जीवन हा वास्तवदर्शी चित्रकोश चांगलाच नावाजला गेला. हा कोश 2002 साली महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रकाशित केला गेला होता. त्यानंतर ‘आदिवासी आणि ठाकर समाजशास्त्रीय आभ्यास’, ‘खानदेशातील म्हणी वर्णनात्मक’, ‘बोली आणि प्रमाणभाषा’, व ‘लोकसाहित्य आणि आभ्यास विषय’ या चार बहुमुल्य पुस्तकांच्या प्रकाशनाद्वारे त्यांनी मराठी बोली भाषेतील, व हजारो वर्षांची समृध्द परंपरा लाभलेल्य मराठी लोकसाहित्यातील कित्येक विलोभनीय अशा पैलुंवर लख्ख प्रकाश पाडला. तसेच अप्पासाहेब नागदरकर यांचे व्यक्तित्व उलगडुन दाखविणारी व त्यांच्या गौरवास्पद कारकिर्दीचा वेधसपणे आभ्यास करणारी ‘अप्पासाहेब नागदरकर- जीवन आणि कार्य’ ही त्यांची साहित्यसंपदादेखील वाचकांच्या मनाला भिडली. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग, तसेच प्रशिक्षण संस्था पुणे, यांच्यासाठी संशोधनकार्य करताना अगदी डोळसपणे त्यांनी भिल्लांची बोली व आदिवासी ठाकर हे शोधनिबंधही लिहीले. भिल्ल, ठाकर, व इतर आदिवासी जमातींच्या भाषांमध्ये तज्ञत्व मिळविणारे डॉक्टर रमेश हे स्वतः इंग्रजी विषयामध्ये एम. ए. तसेच पी. जी. डिप्लोमा इन टिचींग ऑफ इंग्लिश हे दोन्ही कोर्सेस झालेले अष्टपैलु भाषातज्ञ आहेत. अर्थशास्त्र, तुलनात्मक साहित्य, तसेच भाषा शिकविण्याच्या शास्त्रशुध्द पध्दतींमध्ये त्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे. संशोधन कार्यातील त्यांनी लिहीलेल्या खानदेशातील कृषक जीवन विषयक शब्दावलीचे भाषावैज्ञानिक अध्ययन या दीर्घ प्रबंधावरून त्यांची दुरदृष्टी, व सुक्ष्म वैचारिक पातळीचे नयनरम्य दर्शन घडते. नागपुर विद्यापीठाची भाषाशास्त्र विभागाची पी. एच. डी. ही अत्यंत मानाची त्यांनी 1989 मध्ये संपादन केली होती. त्यावेळी त्यांनी सादर केलेला 1400 पानांचा दिर्घ प्रबंध आजही भाषाशास्त्र संशोधनक्षेत्रातील एक मैलाचा दगड मानला जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*