सुप्रसिद्ध व्याख्याते, प्रवचनकार, लेखक डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९६१ रोजी झाला.
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे वडील प्रा. सु. ग. शेवडे यांनी प्रवचने, कीर्तने अशा माध्यमांतून हिंदू धर्माची गाथा देशासह परदेशातही पोहोचावी, यासाठी पूर्णवेळ काम केले. हिंदू धर्माचे स्वरूप १० दिवसांत ११० ठिकाणी जाऊन सांगणे, हा त्याचाच एक भाग होता.
सच्चिदानंद शेवडे यांनी इतिहास आणि क्रांतिकारक या विषयांवर भारतात आणि परदेशात ५००० पेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत.
स्विट्झर्लंडमधील माउंट टिटिलिस या युरोपातील सर्वोच्च शिखरावर छत्रपती शिवाजी महाराजांवर व्याख्यान देण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नांवावर जमा आहे.
डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना सह्याद्रि प्रतिष्ठानतर्फे ‘सह्यद्रि’हा वार्षिक पुरस्कार, ‘सेक्युलर नव्हे फेक्युलर’ या पुस्तकाला मसापचा मालिनी शिरोळे पुरस्कार, आम्ही सारे ब्राह्मण’ पाक्षिकातर्फे दिला जाणारा ‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार व पु.भा. भावे स्मृती समितीतर्फे वक्तृत्व पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
Leave a Reply