डॉ. संजीव गलांडे हे पुणे येथील शास्त्रज्ञ आहेत. पी. एच.डी. केल्यावर ते पुण्यातील राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्थेत (एनसीसीएस) संशोधनाचे काम करु लागले. एपीजेनेटिक्स या विषयात त्यांनी मूलभूत स्वरुपाचे संशोधन केले. एपी हा ग्रीक शब्द आहे व त्याचा अर्थ पुढची श्रेणी असा आहे. म्हणजेच जनुकशास्त्रातील पुढच्या श्रेणीचे संशोधन असे त्याचे स्वरुप आहे. डीएनएमधील रासायनिक स्वरुपातील बदलांचा अभ्यास एपीजेनेटिक्समध्ये केला जातो. या संशोधनाबद्दल त्यांना नुकताच भटनागर पुरस्कार मिळाला.सध्या ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अॅण्ड रीसर्च, पुणे येथे जीवशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आहेत.
Leave a Reply