मुंबई विद्यापीठाचे बी.कॉम (स्टॅट.) एल.एल.बी., एम.ए. (भाषाविज्ञान) पीएच.डी. फेलो, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया राष्ट्रभाषा प्रवीण, हिंदी शिक्षक बंद, मराठी साहित्य विशारद, मराठी साहित्य भूषण, वंग भाषा कोविद, तामिळ पदविका, फ्रेंच पदविका, अनेक वर्षे सामाजिक जाणीवेतून हिंदी प्रचारक. अमराठी भाषिकांना मराठी शिकवले. चाळीस वर्षे तज्ञ-लोकप्रिय आयुर्विमा अध्यापक म्हणून लौकिक मिळवला. आयुर्विम्यावरील अनेक क्रमिक पुस्तके लिहिली आहेत. इन्ट्रोडक्शन टु मराठी, कर्वे कुलवृत्तान्त, कण्ठाभरणम् (४३२ संस्कृत श्लोकांचे भाषांतर ४ कॅसेट्ससह) ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. चाळीस वर्षे इंग्रजी-मराठी-हिंदी अनुवादक म्हणून काम केले आहे. काही वर्षे मराठी माध्यमांतून तामिळचे वर्ग चालविले. संस्कृत-गुजराती भाषांशीही परिचय आहे. कन्नडची बोली “तुलू” हिचे व्याकरण त्यांनी तयार केले आहे. पीएच.डी. साठी लिंग्विस्टिक स्टडी ऑफ तुकाराम (१९८५) हा प्रबंधाचा विषय होता. वाईहून प्रसिद्ध होणार्या मराठी विश्वकोशाच्या १६ व्या खंडासाठी विमा ह्या विषयावर त्यांनी विस्तृत लेखन केले आहे. संपूर्ण दासबोध रोमन लिपित लिहून इंग्रजीमध्ये भाषांतरीत केला आहे. तो इ.स. २०१० मध्ये प्रसिद्ध झाला आहे.
आयुर्विमा महामंडळात ४० वर्षे नोकरी करून डिव्हीजनल मॅनेजरच्या पदावरून निवृत्त झाल्यावर काही वर्षे श्री. ना.दा.ठा. विश्वविद्यालयाच्या मुंबईच्या वाणिज्य महाविद्यालयांत “उत्तरदायित्व विमा” (Liability Insurance) हा विषय तृतीय वर्षास शिकवला. ठाणे लॉ कॉलेजमध्ये “इन्शुरन्स लॉज” चे काही काळ अध्यापन केले.
गेली कही वर्षे एजंटसाठी (इंग्लिश आणि मराठीत) प्रशिक्षक होते. त्यांच्यासाठी त्यांनी पहिले क्रमिक पुस्तक २००० मध्ये लिहिले.
Leave a Reply