(डॉ.) उदय सखाराम निरगुडकर

निरगुडकर, (डॉ.) उदय सखाराम

ठाण्यातील गुणवंत विचारवंत आणि कलावंतांचा विचार करताना एक नाव प्रामुख्याने समोर येतं ते म्हणजे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक म्हणून डॉ. निरगुडकर यांना आपण ओळखतोच परंतु स्वयंरोजगार आणि सामाजिक कार्य यातही त्याचं वैशिष्ट्यपूर्ण कार्य आहे. विशेषत: माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रांत त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.

ठाण्यातील एक हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणारं पहिलं कॉल सेंटर सुरु करुन डॉ. निरगुडकरांनी एक नवा वस्तुपाठच घालून दिला आहे. तसेच संपूर्ण भारतातील ६०,००० अर्धशिक्षित तरुणांना स्वयंरोजगारासाठी क्षमतावृद्धीचे शिक्षण देऊन रोजगारासाठी समृद्ध केलं. त्याचबरोबर महानगरपालिकांच्या शाळांचा दर्जा सुधार प्रकल्पातही त्यांचं महत्वाचं योगदान आहे. कलासरगम ह्या सांस्कृतिक संस्थेद्वारे अनेक चांगल्या कलाकृतींच्या निर्मितीत डॉ. निरगुडकरांचा सहभाग असतो. तसंच शहरातल्या अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

1 Comment on (डॉ.) उदय सखाराम निरगुडकर

  1. नमस्कार
    तुम्ही अनघा पाठक यांची घेतलेली मुलाखत आज ऐकली .अक्षरश; भाराऊन गेलो अनघा म्हणते मैत्री केली अंधाराशी स्पर्षाची शिकले भाषा //
    गुरु म्हणाले ध्यान अवस्था तुझ्या मिळाली कोषा //या ओळी मला सुचल्या असो मला अनघा पाठक ताईचा फोन नबर आपण द्यावा ही नम्र विनंती आपला
    कविराज फलटण ०८/१२/2018

Leave a Reply

Your email address will not be published.


*