देशपांडे, (डॉ.) वसंतराव

Deshpande, Dr. Vasantrao

डॉ. वसंतराव देशपांडे हे हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते होते. त्यांचा जन्म २ मे १९२० रोजी अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर येथे झाला.

वसंतराव देशपांड्यांनी असदअली खाँ, सुरेशबाबू माने, अमानतअली खाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतले. त्यांच्यावर पं. दिनानाथ मंगेशकर यांच्या गायकीचाही प्रभाव होता.

प्रारंभीची चोवीस वर्षे त्यांनी संरक्षण हिशेब खात्यात नोकरी करीत संगीताची उपासना चालू ठेवली. त्यानंतर मात्र नौकरी सोडून त्यांनी पूर्णवेळ संगीताला वाहून घेतले.

ठुमरी, दादरा आणि गझल हे हिंदूस्तानी संगीताचे तीनही प्रकार त्यांनी अत्यंत सहजतेने सादर केले. ते केवळ गायकच नव्हते तर गायक-नटही होते. संगीत नाटकांच्या सुवर्णयुगात कट्यार काळजात घुसली या नाटकामुळे त्यांची लोकप्रियता अतिशय वाढली. हे नाटकही त्यांनी साकारलेल्या खानसाहेबाच्या भूमिकेमुळे अजरामर झाले. नाटकातील त्यांची भूमिका इतकी गाजली होती की लोक त्यांना पंडित वसंतखान देशपांडे अशा आगळ्यावेगळ्या नावाने ओळखत असत.

सर्व प्रकारच्या गायकीवर आणि तबला, हार्मोनियम या वाद्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. पु.ल.देशपांड्याच्या साथीने त्यांनी अनेक कार्यक्रम गाजवले.

कट्यार व्यतिरिक्त विज म्हणाली धरतीला, हे बंध रेशमांचे, मेघमल्हार, तुकाराम तसेच वार्‍यावरची वरात ही त्यांची इतर नाटकेही गाजली. वयाच्या केवळ आठव्या वर्षी त्यांनी कालिया मर्दन या चित्रपटात काम केले होते. त्यानंतर दुधभात, अष्टविनायक या चित्रपटांतही त्यानी काम केले. पेडगावचे शहाणे, गुळाचा गणपती, दूधभात, अवघाची संसार वगैरेसारख्या तब्बल ८० हून जास्त चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.

१९८२ सालच्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

आपल्या कारकिर्दीच्या ऐन भरात असताना २ मे, १९२० – ३० जुलै, १९८३ रोजी त्यांचे निधन झाले.

वसंतरावांच्या बद्दल “पु.ल” म्हणतात…..

‘वसंताची गायकी पंरपरेच्या पालखीतून संथपणे मिरवीत जाणारी नाही.
दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी त्याच्या गायकीची मूर्ती आहे. भर उन्हाळ्यात पलाशबनात अग्निपुष्पे फुलावी तशी ही गायकी. ती फुले पहायला उन्हाची तिरीप सोसणारी जवानी हवी.’ – पु.ल. देशपांडे
http://cooldeepak.blogspot.com/2009/01/blog-post.html

‘आठवणीतली-गाणी.कॉम’ या संकेतस्थळावर पं. वसंतराव देशपांडे यांनी गायलेली गाणी
http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Vasantrao%20Deshpande.htm

डॉ. वसंतराव देशपांडे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे (2-May-2017)

हिंदुस्तानी संगीतशैलीतील प्रसिद्ध गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडे (30-Jul-2021)

## Vasantrao Deshpande

2 Comments on देशपांडे, (डॉ.) वसंतराव

Leave a Reply

Your email address will not be published.


*