कामत, (डॉ.) वसुधा

 

शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणारी योग्य व्यक्ती आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या डॉ. कामत यांची वाटचाल कौतुकास्पद आहे. पुणे आणि मुंबई विद्यापीठांमधून विविध पदव्या त्यांनी प्राप्त केल्या. रसायनशास्त्रात पदवी, फिलॉसॉफीमध्ये डॉक्टरेट आणि सोशॉलॉजीमध्ये मास्टर्स अशा विविध विषयांमध्ये त्यांनी यश संपादन केले. आधी एका माध्यमिक शाळेत गणित आणि विज्ञान शिकवण्यास त्यांनी सुरूवात केली. त्यानंतर संगमनेरमधील कॉलेजात लेक्चरर, एसएनडीटीच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर, दूरस्थ शिक्षणपद्धती केंदाचे अध्यक्षपद आणि त्यानंतर थेट एनसीईआरटीचे संयुक्त संचालकपद अशी यशस्वी वाटचाल त्यांनी केली आहे. एनसीईआरटीमध्ये असताना ऑनलाइन एज्युकेशन ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. कामत यांनी विविध प्रयोग केले. गुगल अर्थ किंवा गुगल मॅप यांच्या माध्यमातून शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवता येते. त्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेता येईल, हे जाणूनच त्यादिशेने पावले उचलण्याचा महत्त्वाचा निर्णय संयुक्त संचालकपद सांभाळताना त्यांनी घेतला. दूरस्थ शिक्षणपद्धतीमध्ये इंटरनेटच्या माध्यमातून काही ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाचा फायदा केवळ एसएनडीटीपुरताच मर्यादित न ठेवता देशभरातील शैक्षणिक संस्थांना त्यांनी मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ, इस्रो अहमदाबाद, आमीर् एज्युकेशन कॉर्प्सचे ट्रेनिंग कॉलेज अशा संस्थांमध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शिक्षकांची संख्या कमी किंवा शिक्षक नाही अशी ओरड करण्यापेक्षा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसे पोहोचवता येईल यासाठी त्यांनी पुस्तके आणि लेख लिहिले. ‘सेल्फ लनिर्ंग मटेरियल अॅण्ड दे अर युज’ आणि इण्टरअॅक्टिव्ह मल्टिमीडिया अॅण्ड देअर युज’ ही त्यांची पुस्तके. तसेच जयश्री शिंदे यांच्यासोबत लिहिलेला ‘लनिर्ंग स्टाइल्स अॅण्ड कम्प्युटर बेस्ड लनिर्ंग’ हा त्यांचा लेख आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात वाचला गेला. ‘मुक्त आणि दूरस्थ शिक्षण’ पद्धतीमध्ये डॉ. कामत यांची कामगिरी मोलाची आहे. याच विषयावर अनेक देशांमधल्या परिसंवादात त्यांनी भाग घेतला आहे. २००९मध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षकदिनी युनेस्कोच्या पॅरिस येथील कार्यक्रमात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. शैक्षणिक क्षेत्रात नवीन संकल्पना आणणारी व्यक्ती मुलींच्या एसएनडीटी विद्यापीठाला कुलगुरू म्हणून लाभली आहे.

(महाराष्ट्र टाईम्सच्या सौजन्याने)

1 Comment on कामत, (डॉ.) वसुधा

  1. Prof. Kamat is not originally from Pune. She is from Kokan.
    SNDT Women’s University. It is not a college. This is University. She was Professor and Head of Department of Educational Technology, SNDTWU which is Postgraduate department. She is co-author of the Marathi book “Educational Technology” with Dr. S S Kulkarni but not have not authored the books mentioned din this article. She has many papers presented in International Conferences.

Leave a Reply

Your email address will not be published.


*