एम.बी.बी.एस.डी. उच्च प्रशिक्षण इंग्लंड व अमेरिका. भारतीय औषध उद्योगात २८ वर्षे कामगिरी व अध्यक्ष या पदावरुन निवृत्ती. सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक. संगीतातील २२ श्रुतींवर आधारित जागतिक दर्जाचे संशोधन.
डॉ. विद्याधर ओक ह्यांच्यासाठी तर सर्व क्षेत्रांच्या सीमा ह्या कमी पडतात. उत्तुंग कर्तृत्व असणारे डॉ.विद्याधर ओक हे संगीततज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ, औषधशास्त्रज्ञ, उद्योजक, वक्ते, लेखक, डॉक्टर, असे बहुआयामी व्यक्तिमत्व !
डॉ. विद्याधर ओक हे इंग्लंड व अमेरिकेत उच्चशिक्षण घेऊन आल्यावर भारतीय औषध उद्योगात २८ वर्षे कामगिरी व अध्यक्ष या पदावर काम केले. ते सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक व संगीत संशोधक आहेत. संगीतातील २२ श्रुतींवर जागतिक दर्जाचे संशोधन त्यांनी केले.
२२ श्रुतींवरील संपूर्ण पदार्थ, शास्त्रीय व गणिती माहितीचा व गुगलवरील www.22shruti.com ही जगातील पहिली वेबसाईट तयार केली. त्यांनी अनेक महोत्सवात हार्मोनियम वादन केले आहे. आशा भोसले, पं.वसंतराव देशपांडे इ. दिग्गज गायकांना त्यांनी साथसंगत केली. त्यांनी २२ श्रुतींवरील भारतातील एकमेव पेटंट मिळवले. २२ श्रुतींच्या हार्मोनियमची व श्रुतीनिपुण या जगातील पहिल्या २२ श्रुती मेटॅलोफोन या नवीन वाद्याची त्यांनी निर्मिती केली. व्याख्याने, लेख व वैयक्तिक मार्गदर्शन करुन ते नेहमीच आपल्या कामाचा प्रसार करतात. भाग्यश्री ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे ते संचालक आहेत.
पुरस्कार : डॉ. विद्याधर ओक हयांना आतापर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात ठाणे भूषण, ठाणे नगररत्न, ठाणे मानबिंदू, केशवराव भोसले, स्वा. सावरकर पुरस्कार, अनिल मोहिले पुरस्कार, महाराष्ट्र टाईम्स सन्मान, सूरमणी, स्वरक्रांती पुरस्कार, डॉ. शरदिनी डहाणूकर पुरस्कार, डॉ. शरदिनी डहाणूकर पुरस्कार, बंडुभैय्या चौघुले पुरस्कार, ह्यांचा समावेश आहे.
Leave a Reply