शिक्षणतज्ञ, देशभक्त, तत्त्वज्ञ, व पुण्यातील ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक यांचा जन्म १७ ऑगस्ट १९१६ रोजी झाला.
अप्पा पेंडसे हे एक दूरदृष्टी असलेले देशप्रेमी शिक्षणतज्ज्ञ होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य असलेले अप्पा पेंडसे हे पीएच.डी पदवी धारण करणारे, संगीत आणि वेदान्त या दोघांतही रस असणारे तत्त्वज्ञ, लेखक, आणि मनात क्रांतिकारी विचार बाळगणारे आदर्शवादी कार्यकर्ते होते.
अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. सदूभाऊ गोखले यांनी सुरू केलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या पुण्यातील पहिला सात सभासदांमधले ते एक होते. दलाच्या बॅँड पथकात ते बॅँड वाजवीत. तरुण जवाहरलाल नेहरूंचे स्वागत करणार्याठ भारतीय काँग्रेस पक्षाच्या स्वयंसेवकांमध्ये त्यांचाही समावेश होता.
अप्पा पेंडसे यांचे चरित्र डॉ. स्वर्णलता भिशीकर यांनी लिहिले आहे.
अप्पा पेंडसे यांचे १९ ऑगस्ट १९८३ रोजी निधन झाले.
Leave a Reply