ग. रा. कामत

पटकथाकार ग. रा. कामत यांचा जन्म १२ मार्च १९२३ रोजी अलिबाग जवळील सरी या गावी झाला.

ग.रा.कामत हे ‘ग.रा.’ या नावानेच प्रसिद्ध होते. कामत रुईया महाविद्यालयात शिकत असताना थोर संशोधक व अभ्यासक न.र.फाटक यांचा त्यांना सहवास लाभला आणि त्यांच्या साहित्यिक व संपादकीय गुणांना वेगळे वळण मिळाले.

व्यासंगी संपादक श्री. पु. भागवत हे त्यांचे समकालीन स्नेही. ग. दि. माडगूळकर हे ही ग.रा.कामत कामत यांचे गुरू. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटासाठी कामत यांनी माडगूळकर यांचे सहाय्यक लेखक म्हणून काम पाहिले होते. अतिशय तल्लख अशी स्मरणशक्ति,अफाट वाचन हे त्यांचे गुणविशेष होते. ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या संपादकीय विभागात ग.रा.कामत यांनी उपसंपादक म्हणून काही काळ नोकरी केली होती.

‘मौज’ आणि सत्यकथा’ या मासिकांचे संपादकीय कामही त्यांनी पाहिले होते. ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत या त्यांच्या पत्नी होत. ग.रा.कामत यांचे निधन ६ ऑक्टोबर २०१५ रोजी झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*