रायगड जिल्ह्यातील चौल येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजानन पिळणकर यांना लहानपाणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे ते मुंबईत दाखल झाले व स्वकष्टाने स्वत:चं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली.
तिथे नोकरी करीत असताना त्यांच्यातील व्यावसायिक स्वस्थ बसू देत नव्हता म्हणून त्यांनी इलेक्ट्रिक वस्तू विकण्याचा व्यवसाय सुरू केला. १९५४ साली पिळणकर यांनी व्यवसायाचे रूपांतर “दादर डिपार्टमेंटल स्टोअर्स” मध्ये केले व अल्पावधीतच ते दादर परिसरात व्यावसायिक म्हणून परिचित झाले. त्याकाळात “सुमीत मिक्सर-ग्राईंडर” चे नाव घरोघरी पोहोचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. उद्यमशीलता, चोख व्यवहार आणि विश्वासार्हता हे त्यांच्यातील महत्त्वाचे गुण होते.
(लेखन व संशोधन – सागर मालाडकर)
Leave a Reply