नृत्य क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कामाचा आदर्श निर्माण करणार्या गणेश राऊत यांचं शिक्षण शिवाजी विद्यालयातून झालं आहे. उत्तम खो-खो पटू असले तरी क्रीडा क्षेत्रातील राजकारणामुळे विचार बदलावा लागला. शाळेत असल्यापासून अनेक नृत्यात, नाटकांत त्यांचा सहभाग असायचा. अविष्कार वळवळीचे संस्कार घेऊन आलेले गणेश राऊत यांनी अनेक चित्रपट, जाहिराती, नाटकं, सोहळे यांचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. अनिल कपूर निर्मित “गांधी माय फादर” या चित्रपटातील एक गीत तसेच विजू माने दिग्दर्शित “डॉटर्स” मधील चाळीस मुलांवर चित्रित झालेले नृत्य दिग्दर्शित करण्याची संधी त्यांना मिळाली आहे. याशिवाय “झंडू बाम”, “इमामी फूड ऑईल”, “बोरोप्लस” इत्यादी जाहिरातींच नृत्यदिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे “बाई रे बाई”, “अडला हरी घरोघरी”, “वंदे मातरम्”, “दुर्गा झाली गौरी”, इत्यादी नाटकांसाठी कोरिओग्राफर म्हणूनही काम केलं आहे. याशिवाय पहिल्या आय.पी.एल. (IPL) चा सांगता सोहळा, २००७ साली गोवा इथे झालेला (IFFI) अॅवॉर्ड चा सोहळा, झी गौरव पुरस्कार सोहळा, “सारेगमप” चे सर्व महाअंतिम सोहळे, ठाणे येथे झालेला शिवगौरव पुरस्कार सोहळा, टेंभी नाका दहीहंडी उत्सव सोहळा इत्यादी अनेक सोहळ्यांचं त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
गणेश राऊत याना कामगार कल्याण मंडळाचा पुरस्कार यासह अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
Leave a Reply