बालसाहित्यकार, कवी, गीतकार आणि नाटककार गंगाधर मनमोहन महांबरे यांचा जन्म कोकणातील मालवण येथे ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मालवणच्या रघुनाथ देसाई या मराठी शाळेत तर माध्यमिक शिक्षण टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. शालांत परीक्षा १९४९ साली ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर १९५६ साली त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली.
मुंबईच्या एल्फिस्टन महाविद्यालयात काही काळ त्यांनी ग्रंथपाल म्हणून नोकरी केली. त्यानंतर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये, किर्लोस्कर ऑईल इंजिनच्या ग्रंथालयात आणि पुण्याच्या ऑमोटिव्ह रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ग्रंथपाल म्हणूनही काम पाहिले.
महांबरे यांच्या लेखनाची सुरुवात १९४८ पासून झाली. ‘दिलजमाई’, ‘रंगपंचमी’, ‘सिधुदुर्ग’, ‘कोल्हा आणि द्राक्षे’ अशा अनेक नाटिका ‘देवदूत’, ‘संतांची कृपा’, ‘नजराणा’ इ. नाटकं. ‘गौतमबुद्ध’, ‘जादूचा वेल’, ‘जादूची नगरी’, ‘बेनहर’ ही बालसाहित्याची पुस्तकं तर ‘चार्ली चॅपलीन, वॉल्ट डिस्नी यांची चरित्रे’ इ. त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे.
रंगभूमीवरील गाण्यांचा संग्रह, नाटकातील गाणी, महाराष्ट्र गौरवगीते, पी. सावळाराम, आचार्य अत्रे, वि. स. खांडेकर, ग. दि. माडगूळकर, पु. ल. देशपांडे यांच्या गीतांचे संग्रह त्यांनी संपादित केले. तसेच ‘आपली आवड’, ‘उषःकाल’, ‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मराठी गजल’, ‘आनंदाचे डोही’ इ. त्यांचे गीत संग्रह प्रकाशित आहेत.
गंगाधर मनमोहन महांबरे यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
## Gangadhar Mahambare
Leave a Reply