२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके मिळविणारे एकमेव मराठी लष्करी अधिकारी. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी मुंबई येथे झाला.
१ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर भारतीय लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते.
त्यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे, व कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. त्याचप्रमाणे ४ वर्षे पुण्यात रमणबागेतही शिक्षण झाले.
शिक्षण चालू असताना मिलिटरीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती. १९४४ साली त्यांनी इमरजन्सी कमिशन मिळवले व ३० जानेवारी १९४५ ला त्यांना कायम कमिशन मिळाले. त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले
इ.स. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम्४७ व एस्४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या “शेरमन” रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले. ६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले.
त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले.
१९७१ साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी अतुल लढाई दिली
१ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे सरसेनानी म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. “जनरल” म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्या सारखी आहे. २०,००० फूटांवर “सियाचेन” प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदी सेना व रशियन बनावटीची टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा त्यांनी तयार केला.
तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. त्याचे सूत्र त्यांनी आखून दिले.
पुण्यात कोरेगांव पार्कमध्ये त्यांनी आरोही हा बंगला बांधला आणि आपल्या पत्नी मुलींसह ते पुण्यात राहण्यास आले.
पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी असावा. घोड्यावरची रोजची रपेट, वाचन, संगीत हे त्यांचे आवडते कार्यक्रम.
पुण्यास स्थायिक झाल्यानंतर आपल्या पत्नी मुलीसमवेत त्यांचे आनंदी आयुष्य चालू होते. परंतु ऑपरेशन ब्ल्यू स्टारचा उल्लेख असलेली टाइप केलेली धमकीवजा पत्रे येतच राहिली. एक अंगरक्षक त्यांना पोलिसांनी दिला. परंतु १० ऑगस्ट १९८६ रोजी दोन शिख तरुणांनी त्यांची मारूती गाडीत निघृण हत्या केली.
त्यांचे १० ऑगस्ट १९८६ रोजी पुणे येथे निधन झाले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
## Chief of Army Staff (Ex) – General Arunkumar Vaidya.
Leave a Reply