कुकडे, गोपी

श्री गोपी कुकडे हे जाहिरात जगतातील एक नावाजलेलं व्यक्तीमत्त्व.

जे जे स्कूल ऑफ आर्टसमधून त्यांनी कमर्शिअल आर्टस या विषयात शिक्षण घेतलं. खरंतर ते तिथे आर्किटेक्ट बनण्यासाठी गेले होते. पण त्यांच्यातल्या कलाकारानं त्यांना या विषयाकडे ओढून आणलं. कॉलेजमध्ये असताना त्यांनी बर्‍याच सिनेमांची होर्डिंग्स बनवली. त्याकाळी फ्लेक्सचा जमाना नव्हता त्यामुळे सिनेमांची होर्डिंगस् चांगल्या चित्रकारांकडून रंगवून घेतली जातं असतं. गुलजार यांच्या “मीरा” या चित्रपटासाठी त्यांनी केलेल्या जाहिरात कॅंम्पेनसाठी त्यांना सुवर्णपदक मिळालं. त्यांनी चैत्र अ‍ॅव्हर्टायजिंग या जाहिरात एजन्सीमधून आपला जाहिरात जगतातला प्रवास सुरु केला. त्यानंतर क्लॅरिअन अ‍ॅव्हर्टायजिंग व शेवटी एव्हरेस्ट अ‍ॅव्हर्टायजिंग मधून त्यांनी नोकरीचा प्रवास थांबवला.

१९८२ मध्ये त्यांनी अ‍ॅडव्हर्टायजिंग अव्हेन्यूज ही स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरु केली. या प्रवासात त्यांनी एशियन पेंटस, ग्लॅक्सो, स्टॅनरोज फॅब्रिक्स, सेंटॉर हॉटेल, हॉकिन्स प्रेशर कुकर, युएफओ जीन्स, पान पसंद आणि ओनिडा टीव्हीसारख्या मोठ्या ब्रॅंडच्या कॅम्पेन्स हाताळल्या. अव्हेन्यूजसाठी त्यांनी डझनभर जाहिरातपटांचीही निर्मिती केली. त्यांना अनकवेळा CAG आणि Ad club awards नेही गौरविण्यात आले आहे. १९९० मध्ये त्यांनी जाहिरातक्षेत्रातून तात्पुरते बाहेर पडून स्वत:चा सिरॅमिक स्टुडिओ गोरेगाव येथे सुरु केला. १९९८ मध्ये Useless Ceramic’ by Gopi Kukde या नावाने सिरॅमिक गॅलेरीही सुरु केली. आता पुन्हा ते आपल्या आवडीच्या जाहिरातक्षेत्रात कार्यरत आहेत. गप्पा मारणे, त्याही विद्यार्थांशी… हा त्यांचा आवडता छंद आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*