गोपीनाथ मुंडे हे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते होते. ते खर्या अर्थाने `लोकनेते’ होते.
विद्यार्थी दशेपासुनच विविध चळवळींमध्ये सक्रीय असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर यशाची विविध शिखरे गाठली.
१९९१ ते १९९५ या काळात महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी आपला वेगळा असा ठसा उमटविला. उपमुख्यमंत्रीपदाची त्यांची कारकीर्द अनेक तडफदार निर्णयांनी गाजली. याच काळात महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हणून त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर परिश्रम घेतले.
प्रभावी वक्तृत्व, दांडगा जनसंपर्क आणि तळागाळातल्या लोकांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ हे त्यांचे गुण जनमानसांवर कोरले गेले आहेत.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. मे २०१४ मध्ये झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या प्रचंड विजयानंतर गोपीनाथ मुंडे यांच्याकडे देशाच्या ग्रामविकास मंत्रालयाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.
३ जून २०१४ रोजी नवी दिल्लीहून मुंबईकडे येण्यासाठी विमानतळावर पोहोचताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांची प्राणज्योत मालवली.
Leave a Reply