बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचा जन्म २९ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला.
बालसाहित्यिक, चरित्रकार, कवी व “आनंद” मासिकाचे संपादकपद ३५ वर्षे सांभाळणारे गोपीनाथ तळवलकर यांनी प्रौढसाक्षरांसाठीही लिखाण केले. कणिका, खंडकाव्य, बालकविता असे विविध काव्यप्रहार हाताळूनही त्यांचे नाव झाले नाही. आकाशमंदिर, छायाप्रकाश, नंदिता या कादंबर्या, “ज्ञानेश्वरीतील सौंदर्यविश्व” हे रसग्रहण, तसेच मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली होती.
गोपीनाथ तळवलकर यांचे ७ जून २००० रोजी निधन झाले.
Leave a Reply