भारत स्वतंत्र झाल्यानंतर इथल्या राज्यकर्त्यांनी जुनी मोजमापे, चलन आणि परिमाणे ही बदलली. तसेच भारताचे एक राष्ट्रीय कॅलेंडर ही १९५७ साली अस्तित्वात आले. त्यासाठी नेमण्यात आलेल्या “मेघनाथ सहा समिती” ने सुचविलेल्या शिफारशीनुसार भारतीय सौर कालगणनासुरु झाली, त्या कालगणनेचा पहिला दिवस असतो २२ मार्च. (अपवाद फक्त लीप वर्षाचा, त्या वर्षी सौर वर्ष एक दिवस आधी म्हणजे २१ मार्चला सुरु होतं) पण ही कालगणना अस्तित्वात येऊन अर्धशतक उलटले तरीपण ही फारशी प्रचलित नाही, आणि याच कालगणनेच्या प्रसाराचं कार्य हेमंत मोने यांनी हाती घेतली आहे. कल्याणच्या अभिनव विद्यामंदीर शाळेचे गणित आनि विज्ञानाचे शिक्षक म्हणून मोने यांनी निवृत्ती नंतर त्यासाठी ते कालगणना प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यासाठी ते लेख लिहितात, व्याख्याने देतात, व बॅंकींग व्यवहार सुद्धा कालगणनेनुसार करतात, त्यांच्या चेकवर भारतीय सौर दिनांक पाहिला की बॅंकेतील कर्मचारी सुद्धा गडबडतात, मग हेमंत मोने त्यांना भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा आदेश दाखवतात. एकट्या शिलेदाराप्रमाणे हेमंत मोने भारतीय सौर दिनांक व या कालगणनेचे माहत्म्य पटवून देत आहेत.
Leave a Reply