पंजाबी, हिरा

लेखक, अभिनेते, चित्रकार, संगीत या क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिंबरोबरच छायाचित्रण या क्षेत्रातील देखील मातब्बर मंडळी ठाण्यामध्ये वास्तव्याला आहेत. त्यापैकीच एक म्हणजे श्रेष्ठ छायाचित्रकार हिरा पंजाबी हे आहेत.

भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि प्रदर्शनांमध्ये ५०० छायचित्रांहून अधिक छायाचित्रे प्रदर्शित करणारे हिरा पंजाबी यांना ठाणे गुणीजन हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ऑक्टोबर २००० आणि २००३ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी आणि टॅन्जेंट कलादालनात येथे वन्यजीवन या विषयावर त्यांना छायाचित्रप्रदर्शन भरवलं. “मूडस् ऑफ नेचर अॅण्ड वाईल्ड लाईफ” या विषयावर एन.सी.पी.ए. मुंबई येथे ऑक्टोबर २००६ मध्ये छायाचित्रांचे प्रदर्शन भरवले.

आजवर २००९ आणि २०१० सालचे जर्मनी येथील छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक, फोटोग्राफिक सोसायटी ऑफ इंडियाचा फोटोग्राफर ऑफ द इयर पुरस्कार, २००५ सालचा अमेरिकेतील बेस्ट फोटोग्राफर पुरस्कार असे अनेक मानाचे सन्मान मिळाले आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*