सांस्कृतिक वारसा लाभलेल्या ठाणे शहरास क्रीडापटूंची नगरी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन ह्या क्रीडाप्रकारात यश प्राप्त करुन इशान नकवी ह्याने ठाण्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव केला.
लखनौमधील भारतीय वरिष्ठ गटासाठी त्याची निवड करण्यात आली होती. ज्यात चेतन आनंद आणि सायना नेहवाल ह्यांचाही समावेश होता. चेन्नई मधील भारतीय खुल्या स्पर्धेसाठी त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. “इंडोकॉक बालीकोटा सुराबाया कप” ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सुद्धा त्याची निवड झाली होती. इशान नकवी याने पुरुष एकेरी स्पर्धेत आपल्या क्रीडानैपुण्याने हॉंगकॉंग, (चायना) येथील स्पर्धेत क्रिडाक्षेत्राचे लक्ष वेधले. क्वालालंपूर येथील कनिष्ठ अशियाई स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती.
(संदर्भ : माझे ठाणे)
Leave a Reply