गुप्ते, जनार्दन खंडेराव

कै. जनार्दन खंडेराव गुप्ते यांचा जन्म २९ मार्च १९१३ रोजी बडोदा येथे झाला.

मॅट्रीक झाल्यावर १९३९ साली ब्रिटीश सैन्यामध्ये भरती झाले. त्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये जपानी सैनिकांनी पकडले. तेथून पळून १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखल झाले. १९४२ ते १९४५ ही ३ वर्षे आझाद हिंद सेनेत कार्य करीत असताना त्यांना २ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. ऑगस्ट १९४५ मध्ये ते भारतात परत आले.

१९४७ साली कु.सुमती गजानन चिटणीस (सौ.राजलक्ष्मी जनार्दन गुप्ते) हिच्याशी नाशिक येथे विवाह झाला. त्यानंतर १९४८ साली ठाणे येथे बाळकूमला स्थाईक झाले.

स्वातंत्र्याच्या रौप्य मोहोत्सवी वर्षात दि. १५ ऑगस्ट १९७२ रोजी त्यांना पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट मिळाले. १० जुलै १९७५ पासून केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाकडून त्यांना स्वातंत्र्य सैनिक निवृत्ती वेतन सुरु झाले.

दि. २० जुलै १९८८ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने आझाद हिंद सेनेमधील एका ठाणेकर स्वातंत्र्यसैनिकाचा तेजस्वी अध्याय समाप्त झाला.

 

2 Comments on गुप्ते, जनार्दन खंडेराव

  1. कै.जनार्दन खंडेराव गुप्ते हे माझे चुलत आजोबा असून वरील माहिती मध्ये त्यांची जन्मदिनांक दाखल करावी. त्यांची जन्मतारीख २९ मार्च १९१३ ही आहे. बाकी सर्व माहिती बरोबर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*