परब, जनार्दन

Parab, Janardan

परब जनार्दन

मराठी रंगभूमी, चित्रपट, तसंच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा अविष्कार दाखविणार्‍यांपैकी एक नाव म्हणजे जनार्दन परब लहानपणापासूनच जनार्दन यांना अभिनय कलेची आवड आणि जाण होती, संपूर्ण बालपण कोकणात तर महाविद्यालयीन शिक्षण आणि नोकरीसाठी ते मुंबईत दाखल झाले; अगदी तरुण वयातच ते एकांकीका, प्रायोगिक नाटकांशी ते जोडले गेले; नोकरी व शिक्षण सांभाळत आपल्या अभिनयाची हौस आणि आवड अगदी मनापासून जोपासल; विजया मेहता सारख्या नट मंडळींचे याच काळात त्यांना लाभले; त्यांच्या प्रमुख नाटकांमध्ये “अवध्य”, “नटकीच्या लग्नाला”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “हमिदाबाईची कोठी”, “रात्र थोडी सोंग फार”, “काका किशाचा”, “संगीत विद्याहरण”, “मुद्र राक्षस” तर “धुमशान”, “नशिबवान धाव खावचो”, “कबूतरखाना” सारख्या मालवणी नाटकांमध्ये अभिनयासोबतच दिग्दर्शनाची देखील धुरा सांभाळली.

अनेक हिंदी-मराठी चित्रपटात लहान मोठ्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत यामध्ये “माझा पती करोडपती”, “नवरी मिळे नवर्‍याला”, “गम्मत जम्मत”, “कुलस्वामिनी तुळजाभवानी” चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून, हिंदीत “कसम”, “शिकारी”, “ऐलान”, “जिद्दी”, “क्रांतीवीर”, “बाजीगर”, “नायक”, “गुलाम”, “उडान”, “चाय ना गेट” सारख्या असंख्य चित्रपटांचा उल्लेख करता येईल.

काही वर्षांपूर्वी शारीरिक आजारामुळे जनार्दन परब यांनी कला क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता, पण दुर्दम्य साहस व इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी पुन:श्च या क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनेक मालिका आणि चित्रपटांमधून लहान-मोठ्या भूमिकेच्या माध्यमातून ते आपल्याला दिसत राहिले आहेत. मालवणी रंगभूमीला त्यांनी दिलेलं योगदान सुद्धा वाखाणण्याजोगं आहे, कारण नवीन विषय प्रेक्षकां समोर मांडत, परब यांनी तरुण कलाकारासोबत मालवणी रंगभूमी पुनर्जिवीत ठेवण्याचं कार्य केलेलं आहे. आजही अनेक चित्रपटांमधून तसंच दूरचित्रवाणी मालिकांमधून चरित्र अभिनेता म्हणून त्यांचं काम दखल घेण्याजोगे आहे. जनार्दन परब यांनी चार दशकाहून अधिक काळ रंगभूमी व रुपेरी पडद्यासाठी स्वत:ला अक्षरश: झोकून दिलं; त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना “शंकर घाणेकर पुरस्कार”, २००८ सालचा “नटवर्य केशवराव दाते पुरस्कार” तसंच “कॉलेज साहित्य पुरस्कारानं” सन्मानित करण्यात आलं आहे; आगामी काळात प्रदर्शित होणार्‍या “मुंगळा”, “टपाल” व “छावणी” या चित्रपटांमध्ये त्यांच्या मध्यवर्ती भूमिका असून, एका मालवणी नाटकासाठीची निर्मिती ते करत आहेत.

( लेखन व संशोधन – सागर मालाडकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*