ध्वनिमुद्रिका संग्राहक, लेखक जयंत राळेरासकर यांचा जन्म २६ फेब्रुवारी १९५० रोजी झाला.
आपण जयंत राळेरासकर यांना अवलिया म्हणू शकतो. जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. शिक्षण बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. २००१ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. नोकरी करता करता त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा त्या मुळे १९९२ पासून सोसायटी आॕफ इंडियन रेकॉर्ड कलेक्टर मुंबई च्या संपर्कात राहिले. वाचन, लेखन, संगीत ऐकणे यातून त्यांनी पाच ते सहा हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला.
जयंत राळेरासकर यांचा रेकॉर्डस् जमवणे हा छंद असल्याने त्यासाठी गावोगावी फिरणे आलेच. आपल्या पुस्तकात आणखी त्यांनी हृद्य आठवण ते लिहिली आहे. कोणती गोष्ट कुठे सापडेल हे सांगता येत नाही. त्यांचे मित्र सुधीर पेशवे – हे तुळजापूरचे एक ध्वनिमुद्रिका संग्राहक.
सुधीर पेशवेंचा डोळ्यावर विश्वास बसेना. ती ध्वनिमुद्रिका होती विष्णुपंत पागनीस यांची. चित्रपट ‘संत तुकाराम’आणि गीत होते -आधी बीज एकले ! चार चहांची किंमत देवून त्यांनी ती हस्तगत केली.
‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ आणि ‘आनंदयात्रा’ अशी जयंत राळेरासकर यांची दोन पुस्तके प्रसिध्द झाली आहे. ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ या जयंत राळेरासकर यांच्या पुस्तकात संगीतक्षेत्रात क्रांती घडवून आणणाऱ्या या ध्वनिमुद्रिकांचा रंजक इतिहास जयंत राळेरासकर यांनी ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत ‘मधून सांगितला आहे. तर ‘आनंदयात्रा’ हे जयंत राळेरासकर यांचे जुन्या चित्रपटगीतांवर आधारित पुस्तक आहे. त्यांचे इतर ललित लिखाण,कथा लोकसत्ता, तरूण भारत, नवरंग रुपेरी, मैत्र, तारांगण, मधून प्रसिध्द झाले आहे. आशय” या साहित्यिक दिवाळी अंकाच्या संपादनात त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
Leave a Reply