जयवंत द्वारकानाथ दळवी

लेखक, नाटककार, पत्रकार

कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटके असा लेखणीसंचार ताकदीने करणारे जयवंत द्वारकानाथ दळवी. साहित्यक्षेत्राला विनोदी फटके लगावणारा “ठणठणपाळ” या टोपण नावानेही त्यांनी लेखन केले.

त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला.

वेधक आणि भेदकही निरीक्षणशक्ती, पात्रांचे तपशील मांडण्याची हातोटी ही त्यांची वैशिष्ट्ये.

चक्र, महानंदा, सारे प्रवासी घडीचे, स्वगत आदी २१ कादंबर्‍या, बॅरिस्टर, पुरुष, सूर्यास्त, दुर्गी अशी १९ नाटके, “लोक आणि लौकिक”, परममित्र ही प्रासंगिक लेखांची पुस्तके असे मोठे काम दळवींनी केले. माणसांची दु:खे आणि त्यामागल्या दडपल्या गेलेल्या भावना हे दळवींच्या लेखनाचे सूत्र होते.

९ डिसेंबर १९७३ रोजी जयवंत दळवी लिखित संध्याछाया या नाटकाचा प्रथम प्रयोग दि गोवा हिंदू असोसिएशनतर्फे करण्यात आला.

मराठीसृष्टीवरील जयवंत दळवी यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

## Jaywant Dalvi

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*