जिश्नू संन्याल हे क्रिडाक्षेत्राला लाभलेलं ठाण्यातील रत्न असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बॅडमिंटन खेळाद्वारे स्वत:चे व पर्यायाने ठाणे शहराचे नाव उज्ज्वल करणारे व्यक्तिमत्व आहे. ते प्रसिद्ध बॅडमिंटनपटू असून वयाच्या १६ व्या वर्षी कलकत्यातून ठाण्यातील सय्यद मोदी बॅडमिंटन अॅकेडमीत खेळण्यास स्थलांतरित झाले व त्यानंतर भारताचे प्रतिनिधित्व केले.
ते नैरोबी आंतरराष्ट्रीय आणि मॉरेशिअस पुरुष दुहेरी स्पर्धेचे विजेते आहेत. बहारीन आंतरराष्ट्रीय पुरुष दुहेरी सांघिक खेळात सुवर्णपदक व कांस्यपदक तसेच कोलंबोतील १० व्या आशियाई खेळात त्यांनी कांस्यपदक पटकावले. त्याचप्रमाणे श्रीलंका, बॅंकॉक, साऊथ कोरिआमधील आशियाई चॅम्पीयनशीप व डच, जर्मन, क्वालालंपूर अशा देशांमधील स्पर्धांमध्ये भारताचे नेतृत्वही केले आहे. तसेच त्यांनी चीनमधील गॉंगझू मधे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतात गुवाहाटी, कोची, केरळ, कलकत्ता, ठाणे, पंचकुला मधे पुरुष एकेरी, दुहेरी आणि सांघिक क्षेत्रात सहभाग तसेच पारितोषिके त्यांनी मिळवली.
सध्या त्यांचा दुहेरीमधे ४ था क्रमांक असून कनिष्ठ पुरुष दुहेरी गटात ते प्रथम क्रमांकावर आहेत.
Leave a Reply