![10814](https://www.marathisrushti.com/profiles/wp-content/uploads/sites/2/2014/11/10814.jpeg)
चित्रकला हे कार्यक्षेत्र असलेले श्री. कैलास अन्याल यांनी ठाण्यातील सरस्वती सेकंडरी स्कुलमधून आपल्या शिक्षणाची सुरुवात त्यांनी केली. नंतर रहेजा स्कूल ऑफ आर्ट मधून चित्रकलेचे शिक्षण घेतले.
जाहिरात क्षेत्रात ते १४ वर्षे कार्यरत होते. नंतर मुक्तपणे पूर्णवेळ चित्रनिर्मितीला त्यांनी सुरुवात केली. त्यांचा स्वत:चा स्टुडिओ आहे. त्यांनी पहिले प्रदर्शन ठाण्यात भरवले. त्यानंतर एकूण २० ग्रुप आणि ३ एकल प्रदर्शन भरवली. २०१० साली त्यांनी जहांगीर आर्ट गॅलरी, नेहरु सेंटर इ. ठिकाणी स्वत:च्या चित्रांच प्रदर्शन त्यांनी भरवले. महाराष्ट्राबाहेर बंगलोर येथे २०११ साली त्यांनी प्रदर्शन भरवले. संस्कार भारतीच्या माध्यमातून श्री. पावसकर सर आणि कामत सर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिसरातील हौशी व व्यावसायिक चित्रकारांसाठी चित्रकला व निसर्गचित्रण वर्ग चालविले. त्यासाठी ठाणे, महाराष्ट्र व ग्वाल्हेर येथे निसर्गचित्रासाठी भ्रमंती केली. ठाण्यातील काही संस्था, गॅलरीज तर्फे निसर्गचित्रणाची प्रात्यक्षिके तसेच मेडिकल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अत्रे कट्ट्यावर जमलेल्या अनोख्या सूरमयी मैफिलींत प्रात्यक्षिके व परीक्षक म्हणून कार्य केले.
कैलास अन्याल यांना २००७ साली आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र टाईम्सच्या विशेष मासिकाच्या मुखपृष्ठावर दोनदा त्यांच्या चित्रांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य प्रदर्शनात त्यांची चित्रे निवडली गेली.
Leave a Reply