बगळ्यांची माळ फुले अजुनि अंबरात, त्या तरुतळी विसरले गीत, सखी शेजारिणी.. अशी एकाहून एक सर्वांच्या ओठी असलेली गाणी लिहिणारे ’वा. रा.’ कांत तथा वामन रामराव कांत.
वामन रामराव कांत यांचा जन्म नांदेड येथे ६ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. वा.रा. कांत हे या नावाने लेखन करत. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड येथे झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण १९३१ साली हैदराबाद येथे झाले. त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांचा विवाह सौ. लक्ष्मीबाई – पूर्वाश्रमीच्या गंगूबाई कुर्डूकर यांच्याशी १९३० मध्ये झाला.
‘विहंगमाला’ या नियतकालिकाचे संपादक (१९२८) तसेच विहंग प्रेसचे व्यवस्थापन.
निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक म्हणून नोकरी (१९३३-१९४५)
निजाम सरकारच्याच आकाशवाणी हैदराबाद व औरंगाबाद केंद्रांत मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९४५- १९६०)
भारतीय आकाशवाणीच्या विविध केंद्रांवर मराठी विभागप्रमुख म्हणून काम पाहिले (१९६०-१९७०)
आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सेवानिवृत्त (१९७०)
त्यांनी एकूण १० काव्यसंग्रह लिहिले.
‘दोनुली’
’पहाटतारा’
’बगळ्यांची माळ’
‘मरणगंध’ (नाट्यकाव्य)’
मावळते शब्द’
‘रुद्रवीणा’
‘वाजली विजेची टाळी’
‘वेलांटी’’शततारका’ (१९५०)
’सहज लिहिता लिहिता’
वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र – कविवर्य वा.रा.कांत – हे श्री कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले असून कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
वा रा कांत यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान…
१९६२-६३ वेलांटी या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७७-७८ मरणगंध या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
१९७९-८० दोनुली या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत ‘ पुरस्कार
१९८९-९० मावळते शब्द या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा ‘केशवसुत’ पुरस्कार
१९८८ महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र साहित्य परिषद, हैदराबाद यांच्यातर्फे उत्कृष्ट वाङ्मयसेवेसाठी सन्मान
१९८९ महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे प्रदीर्घ वाङ्मयसेवेसाठी गौरववृत्ती देऊन सन्मान
या व्यक्तिचित्राच्या निमित्ताने इंटरनेटवर वा रा कांत यांचे छायाचित्र शोधण्याचा प्रयत्न केला. केवळ एकच छायाचित्र मिळाले..
`वा रा कांत’ यांच्या गाण्यांनी अनेकांना पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली असेल.. पण हा कवी महाराष्ट्राच्या साहित्यपटावर प्रसिद्धीपरांगमुखच राहिला.
# Kant, Waman Ramrao
# कांत, वामन रामराव
# Kavivarya Va Ra Kant
Leave a Reply