मुळचे सैन्यात असणारे किसन बाबुराव तथा अण्णा हजारे हे महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांनी ग्रामस्थांच्या सहकार चळवळीद्वारे राळेगण सिद्धी या गावाचा कायापालट घडवून आणला आहे. स्वच्छता, पाणी व्यस्थापन व सामाजिक सलोखा यावर त्यांनी भर दिला होता. या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
या नंतर अण्णा हजारे यांनी माहितीच्या अधिकारासाठी आंदोलन केले. माहितीच्या अधिकारावर त्यांनी पुस्तकाचे लेखनही केले आहे. या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा लवकर संमत करावा लागला.
अण्णा हजारे यांनी वेळोवेळी भ्रष्टाचारा विरुद्ध आंदोलने करून जनजागृतीची कामे केली आहेत. त्यांच्या आंदोलनांमुळे अनेक मंत्र्याना वेळोवेळी राजीनामे द्यावे लागले आहेत. लोकपाल बिलासंर्भातल त्यांच्या आंदोलनाला संपूर्ण देशभरातून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला.
Leave a Reply