कोकणातील देवगड सारख्या निसर्गरम्य गावात व सध्या ठाण्यात वास्तव्यास असलेल्या चित्रकार किशोर नादावडेकर हे अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत. निसर्गचित्रे व व्यक्तीचित्रे यांची आवड असलेल्या श्री. किशोर नादावडेकर यांना चित्रकार वासुदेव कामत सर व विजय आचरेकर सर यांचे योग्य ते मार्गदर्शन मिळाले. चित्रे काढण्यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. श्री. राज ठाकरे व अनेक मान्यवर व्यक्तींकडे तसेच ठाणे जिल्हा परिषद, महाराष्ट्र राज्य मुख्यालय, नेहरु सेंटर, कस्टम हाऊस यांसारख्या नामांकित ठिकाणी त्यांची चित्रे संग्रहित आहेत. परदेशातही अनेक चित्रे संग्रहित असणार्या या चित्रकाराची नेहरु सेंटर तर्फे सलग पाचव्यांदा चित्रकला शिबीरासाठी प्रशिक्षक म्हणून निवड झाली. ठाणेकरांसाठी २००९-१० साली ठाणे कलाभवनामध्ये चित्र प्रदर्शनात सहभाग घेतलेल्या श्री. किशोर नादावडेकर यांचा ठाण्यातील कला योगदानात फार मोठा वाटा आहे. त्यांनी खाजगी आर्ट संस्थेतर्फे तसेच ठाण्यात विविध ठिकाणी भरणार्या कला शिबीरांपासून चित्रकारांना मार्गदर्शन केले आहे व करत आहेत.
त्यांना आतापर्यंत अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. निसर्गचित्रे व व्यक्तिचित्रे हे आवडते विषय.
<!– – चित्रकार
गाव : देवगड, सिंधुदुर्ग
पत्ता : ६५/३२, न्यु वृंदावन दर्शन को. ऑप. हौ. सो. वृंदावन सोसायटी, ठाणे (प.) ४००६०१
कार्यक्षेत्र : चित्रकला
दूरध्वनी : २५३६७९३८ – भ्रमणध्वनी : ९८२१३१७३५०
ई-मेल : kishor_nadavdekar@hotmail.com
–>
Leave a Reply